सुपरस्टार्समध्ये 'काटे की टक्कर'

 Mumbai
सुपरस्टार्समध्ये 'काटे की टक्कर'

येत्या ऑगस्टमध्ये आमिर खान, रजनिकांत, अजय देवगन आणि संजय दत्त यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. ऑगस्टमध्ये आमिर खानचा 'सिक्रेट सुपरस्टार', रजनिकांत यांचा '२.൦' आणि अजय देवगनचा 'गोलमाल अगेन' आणि संजय दत्तचा 'भूमी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'सिक्रेट सुपरस्टार' जर ४ ऑगस्टला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तर संजय दत्तचा 'भूमी' सुद्धा याच दरम्यान प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये क्लॅशेश होण्याची शक्यता आहे. संजय दत्तने यावर प्रतिक्रीया दिलीय की, "आमीर आणि मी एकाच इंडस्ट्रीतून आहोत. त्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. तसे तर भूमी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख फायनल झाली नाही आहे."

अक्षय कुमारचा 'टॉयलेट: एक प्रेम कथा' हा चित्रपटही ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर शाहरुख आणि अनुष्काचा चित्रपटही ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शाहरुख आणि अक्षयमध्ये टक्कर होऊ शकते. हीच टक्कर टाळण्यासाठी 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटाची तारीख निर्माते पुढे ढकलण्याच्या विचारात आहेत.

रोहित शेट्टीचा 'गोलमाल अगेन' हा सिनेमा दिवाळीच्या आसपास प्रदर्शित होणार आहे. पण रजनिकांतचा '२.൦' हा सिनेमाही दिवाळीत पदर्शित होणार आहे. त्यामुळे रोहित शेट्टी 'गोलमाल अगेन'च्या प्रदर्शनाची तारीख बदलणार असल्याचे बोलले जाते.

Loading Comments