मुंबई - बॉलिवूडचे कलाकार मराठी इंडस्ट्रीच्या प्रेमात पडायला लागलेयत हे काही वेगळं सांगायला नको. मराठीतल्या बऱ्याच सिनेमांसाठी आता हिंदी कलाकारांची नाव जोडली जाऊ लागली आहेत. त्यात आता आमिर खानचं ही नाव जोडलं जाणार आहे. आमीर आता चक्क मराठी सिनेमाला प्रमोट करण्यासाठी पुढे आला आहे. bollywoodhungama.com ने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खानने आगामी मराठी सिनेमा ‘ती सध्या काय करते’ या सिनेमाला प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे. सतीश राजवाडे यांचं दिग्दर्शन, अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर या आठवड्यात रिलीज होणाऱ्या त्याच्या ‘दंगल’ सिनेमासोबत दाखवणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड कलाकार मराठी सिनेमांच्या प्रेमात आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.