आमिरचा फॅट टू फिट प्रवास...

  मुंबई  -  

  मुंबई - आमिर खानला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' हे नाव किती योग्य आहे हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. आमिरच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या सिनेमा 'दंगल'ची सध्या बरीच चर्चा आहे. पण जास्त चर्चा होतेय ती या सिनेमातील आमिरच्या लूक आणि त्यानं वाढवलेल्या वजनाची. येत्या 23 डिसेंबर ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  आमिरने त्याच्या दंगल या सिनेमासाठी वजन वाढवलं आणि ते तितक्याच मेहननतीनं कमीही केलं. त्याने या त्याच्या सर्व प्रवासाचा व्हिडीओ यूटीव्ही मोशन पिक्चरच्या सहाय्यानं तयार केलाय. तो UTV Motion Pictures फेसबुकवर शेअरही केलाय. या व्हिडीओत दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी आमिरने वजन कमी करण्यासाठी कसे प्रयत्न केलेत त्याची माहिती दिलीय.

  ‘दंगल’ सिनेमात आमीरने पैलवान महावीर फोगट यांची भूमिका साकारण्यासाठी तब्बल 97 किलो इतकं वजन वाढवलं होतं. नंतर वजन कमी करणं अवघड होईल की काय, असंही त्याला वाटलं. मात्र प्रचंड मेहनत घेत त्यानं ते कमीही करून दाखवलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.