Advertisement

पुरस्कार सन्मान सोहळा


पुरस्कार सन्मान सोहळा
SHARES

किंग्ज सर्कल -19 वा 'साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटी' श्री चंद्रशेकरेंद्र सरस्वती राष्ट्रीय मान्यता पुरस्कार सोहळा किंग्जसर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात रविवारी झाला.
या सोहळ्यात साउथ इंडियन सोसायटीचे प्रमुख डॉ. शंकरन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च तांत्रिक शिक्षण आणि मराठी भाषा सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातले आमदार तामिल सेल्वन आणि इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
या सोहळ्यात चार क्षेत्रांतल्या व्यक्तींना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. या मध्ये देवेंद्र फडणवीस (पब्लिक लिडरशिप), किरण कुमार (वैज्ञानिक आणि ISROचे अध्यक्ष), कमला मूर्थी प्रवचनकार, तसंच लंडनमधील आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी आणि तेलगू, तमिळ, संस्कृत आणि कर्नाटकी संगीतातील विद्वान जॉन मार यांचा समावेश होतो. जॉन मार सोहळ्यास उपस्थित राहू न शकल्याने त्यांचा मुलगा जेम्स यांनी पुरस्कार स्वीकारला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement