Advertisement

या कलाकारानं दिव्यांग मुलांना सांगितल्या ऐतिहासिक कथा

काही कलाकार नेहमीच सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेची सेवा करत असतात, तर काही अनाथ आणि दिव्यांग मुलांसाठी कार्यरत असतात. अशाच एका इंटरनॅशनल ख्यातीच्या कलाकारानं दिव्यांग मुलांसह मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांचा आनंद लुटला आणि ऐतिहासिक कथा सांगितल्या.

या कलाकारानं दिव्यांग मुलांना सांगितल्या ऐतिहासिक कथा
SHARES

काही कलाकार नेहमीच सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेची सेवा करत असतात, तर काही अनाथ आणि दिव्यांग मुलांसाठी कार्यरत असतात. अशाच एका इंटरनॅशनल ख्यातीच्या कलाकारानं दिव्यांग मुलांसह मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांचा आनंद लुटला आणि ऐतिहासिक कथा सांगितल्या.

साइटसेव्हर्स इंडिया ही जागतिक स्तरावरील अग्रगण्य विकासात्मक संस्था भारतात अन्य काही उपक्रमांसोबतच सामाजिक समावेशन व समावेशक शिक्षणासाठी काम करते. या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी साइटसेव्हर्स इंडियाचे ब्रॅण्ड अॅम्‍बेसेडर कबीर बेदी यांनी सहा दिव्यांग मुलांना घेऊन मुंबईतील काही प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. कबीर बेदी यांच्या आवाजाच्या माध्यमातून त्यांनी शहराचा अनुभव घेतला आणि विशाल सागर व ऐतिहासिक वास्तू यांचा अर्थ ते कसा लावतात हे सांगितलं.

या बुद्धिमान दिव्यांग तरुणांनी यापूर्वीच नियमित सरकारी शाळांतून शिक्षण घेऊन साचे मोडले आहेत. यात त्यांना साइटसेव्हर्सच्या इन्क्लुजिव एज्युकेशन कार्यक्रमाची मदत होत आहे. साइटसेव्हर्सने त्यांचे मानद ब्रॅण्ड अॅम्‍बेसेडर तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभिनेते कबीर बेदी यांच्यासह बहुसांस्कृतिक मुंबई शहराचा दौरा केला. भारताच्या दूरदूरच्या भागांतून आलेल्या दिव्यांग मुलांसोबत हा दौरा करण्यात आला. साइटसेव्हर्स गेल्या दोन दशकांपासून इन्क्लुजिव एज्युकेशन प्रोग्राम राबवत आहे. बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये जिल्हा स्तरावर हा कार्यक्रम राबवला जात आहे.

या उपक्रमाबाबत बेदी म्हणाले की, जेव्हा तुमची एक संवेदना नाहीशी होते, तेव्हा बाकीच्या संवेदना अधिक क्रियाशील होत. या दौऱ्यादरम्यान मी या मुलांना प्रख्यात स्थळांच्या इतिहासातील कथा सांगितल्या. समुद्र क्षितिजापर्यंत कसा पसरलेला असतो हे सांगितलं, त्यांनी कदाचित प्रथमच पायांना वाळूचा स्पर्श अनुभवला, किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांची हाक ऐकली. या भावना आपण शब्दांत मांडू शकत नाही. दिव्यांगांकडे सहसा समाजाचा एक वेगळा भाग म्हणून बघितलं जातं. या उपक्रमाद्वारे सामाजिक स्वीकृतीचा व समावेशनाचा तसेच विकलांगतेसह जगणाऱ्या मुलांना अध्ययन सोपं होईल असं वातावरण निर्माण करण्याचा संदेश द्यायचा प्रयत्न करत असल्याचं बेदी म्हणाले.

या अनोख्या अनुभवाबाबत झारखंडमधील दुर्गम भागातून आलेली १४ वर्षीय दिव्यांग मुलगी किरन म्हणाली की, साइटसेव्हर्सच्या इन्क्लुजिव एज्युकेशन प्रोग्रामनं मला वाढीसाठी, अध्ययनासाठी आणि मी ज्या जगात जगते ते अधिक चांगलं समजून घेण्यासाठी व्यासपीठ दिलं आहे. मी दिव्यांग आहे म्हणून माझ्या शिकण्याच्या क्षमतेवर आता कोणी शंका घेत नाही. मला राजस्थानातून आलेल्या आणखी काही दिव्यांग मुलांना येथे भेटता आल्याचा आनंद वाटतो.हेही वाचा -

या कलाकारांनी बांधल्या ‘साता जल्माच्या गाठी’

... म्हणून मला चित्रपटांचे सिक्वेल आवडत नाहीत : आयुषमान खुराना
संबंधित विषय
Advertisement