Advertisement

अभिनेता केआरकेला मुंबईत अटक, वादग्रस्त ट्विट प्रकरणी कारवाई

युवासेना सदस्य राहुल कानल यांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता

अभिनेता केआरकेला मुंबईत अटक, वादग्रस्त ट्विट प्रकरणी कारवाई
SHARES

वादग्रस्त ट्विट प्रकरणी अभिनेता कमाल रशीद खान याला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला आज बोरिवली न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये KRK विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान कमाल रशीद खान यांनी 2020 मध्ये एक वादग्रस्त ट्विट केले होते, त्यानंतर युवासेना सदस्य राहुल कनाल यांनी केआरकेविरोधात एफआयआर दाखल केला होता.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही कमाल आर खान विरुद्ध कलम 294 (अश्लील कृत्ये किंवा सार्वजनिक शब्दांसाठी शिक्षा) आणि दोन्ही मृत अभिनेत्यांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल आयपीसीच्या इतर तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला आहे."

या टिप्पण्यांसाठी 2020 मध्ये KRK विरुद्ध FIR नोंदवण्यात आली होती. युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य राहुल कानल यांनी अधिकृत तक्रार केल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला.

केआरकेने अनेक हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्येच काम केले आहे. त्याने अनेक प्रोजेक्ट्सची निर्मितीही केली आहे. तो बिग बॉसचाही भाग राहिला होता. बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानने KRK वर मानहानीचा खटला दाखल केला होता. केआरकेने सलमान खानच्या राधे चित्रपटाचे नकारात्मक समीक्षण केले होते. यामुळे सलमानने केआरके विरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला होता.

अभिनेता आणि समीक्षक असलेला केआरके म्हणजेच कमाल खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. याआधी त्याने क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या निशाणा साधत वादग्रस्त ट्विट केले होते. बॉलिवूड चित्रपटांवरील वादग्रस्त वक्तव्यांवरुन तो नेहमी चर्चेत असतो. केआरके याने नुकतेच ट्विटर हँडलवरील नाव बदलून कमाल राशिद कुमार असे केले आहे.



हेही वाचा

स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा