Advertisement

स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका

व्यायाम करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका
SHARES

सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांच्याबाबत एक दुःखद बातमी समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्यांच्या जवळच्या व्यक्तीने याबाबत माहिती दिली.

राजू श्रीवास्तव राहत असलेल्या हॉटेलमधील जिममध्ये व्यायाम करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांच्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्या. व्यायाम करत असतानाच राजू श्रीवास्तव जमिनीवर कोसळले. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. याबाबत राजू यांचे पीआरओ अजित यांनी माहिती दिली आहे.

राजू यांचे पीआरओ अजित यांनी सांगितलं की, “राजू आपल्या राजकीय पक्षातील काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्ली येथे थांबले होते. सकाळी ते व्यायाम करण्यासाठी जिममध्ये गेले. व्यायाम करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.” राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा झाली असल्याचंही अजित यांनी सांगितलं.

कलाविश्वातील नावाजलेल्या विनोदी कलाकारांमध्ये राजू श्रीवास्तव यांच्या नावाचाही समावेश आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यामध्ये राजू श्रीवास्तव यशस्वी ठरले. बालपणापासूनच विनोदी कलाकार म्हणून काम करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामुळे राजू श्रीवास्तव नावारूपाला आले.हेही वाचा

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका! ट्रॅफिक जाम करणे पडले महागात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा