Advertisement

'या' कॅप्शनमुळे मकरंद आला चर्चेत

लेखिका निवेदिता पोहनकरने अभिनेते मकरंद देशपांडे सोबतचा सेल्फी शेअर केला होता. ‘घरात चुकीला माफी नाही’ या कॅप्शनमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.

'या' कॅप्शनमुळे मकरंद आला चर्चेत
SHARES

मराठी सिनेमांसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते मकरंद देशपांडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वयाची पन्नाशी ओलांडलेले मकरंद सध्या त्यांच्या २० वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आले आहेत. तिचं नाव आहे निवेदिता पोहनकर. या आधी शशी कपूर यांची कन्या संजना कपूर यांच्यासोबत मकंरद यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.कोण आहे निवेदिता?

निवेदिता पोहनकर ही लेखिका आहे. तीचं नाव पृथ्वी थिएटरशी जोडलं गेलं आहे. निवेदिता मराठी अभिनेत्री अदिती पोहनकर हिची धाकटी बहीण आहे. मागील ७ ते ८ वर्षांपासून मकरंद आणि निवेदिता एकत्र काम करत आहेत.


'या' सेल्फीमुळे रंगल्या चर्चा


Gharat chukila mafi nahi!

A post shared by Nivedita Pohankar (@niveditapohankar) on


नुकताच निवेदिताने दोघांचा सेल्फी शेअर केला होता. ‘घरात चुकीला माफी नाही’ या कॅप्शनमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मॉडेल मिलिंद सोमण याची वयाने लहान असलेल्या गर्लसोबतची लव्ह स्टोरी गाजली होती.हेही वाचा-

'जिद्द सोडू नका'


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा