Advertisement

'जिद्द सोडू नका'


SHARES

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट ‘वजनदार’ या चित्रपटात गोलू मोलू दिसत असली तरी आता ती एकदम फिट झालीय. ‘वजनदार’ या चित्रपटासाठी प्रियानं वजन वाढवलं होतं. मात्र आता तिनं आपलं वजन अथक प्रयत्नांनंतर कमीदेखील केलंय. प्रियानं तिच्या फेसबुक वॉलवर ‘वजनदार’साठी वजन वाढवल्यानंतरचा फोटो आणि तेच वजन पुन्हा कमी केल्याचा फोटो पोस्ट केलाय. "मला कोणतीही गोष्ट मेहनत करून मिळवायला आवडतं', 'त्यातून मिळणारा आनंद हा खूप मोठा असतो', 'मग ते ‘वजनदार’साठी 16 किलो वजन वाढवणं असो किंवा तेच पुन्हा कमी करणं असो', 'जिद्द सोडू नका', 'सुरुवात ही नेहमीच कठीण असते', 'फिटनेस महत्त्वाचं आहे," अशी पोस्ट तिने केलीय.

फोटोसोबत तिनं एक व्हीडिओही शेअर केलाय. या व्हीडिओतून तिचा जाड ते बारीकपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलाय. तुम्ही जाड आहात की बारीक हे महत्त्वाचं नाही. तर तुम्ही किती मौल्यवान आहात ते जाणनं महत्त्वाचं आहे, असं या व्हीडिओतून सांगण्यात आलंय.

प्रियाला व्यायाम आणि सायकलिंग करायला फार आवडतं. नुकतीच प्रिया अभिनेता मिलिंद सोमण याच्या सोबत १० किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये धावली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा