Advertisement

नवाजुद्दीनने 'हिच्या'सोबत केला 'वन नाईट स्टँड'

नवाजच्या आयुष्यावर लिहिलेल्या 'अॅन ऑर्डिनरी लाईफ' या पुस्तकात त्यानं स्वत:च्या खाजगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहे. ज्यात 'मिस लवली' च्या को-स्टारबरोबर चक्क 'वन नाईट स्टँड' केल्याचंही त्यानं कबूल केलं आहे.

नवाजुद्दीनने 'हिच्या'सोबत केला 'वन नाईट स्टँड'
SHARES

नवाजुद्दीन सिद्दीकीचं व्यक्तिमत्त्व भलेही लाजरंबुजरं असलं, तरी त्याने भूतकाळात अशा काही करामती केल्यात की 'त्या' करामती ऐकून त्याचे चाहते नक्कीच थक्क होतील. 

नवाजुद्दीन सिनेमात जशी पात्रं रंगवतो, त्यातुलनेत तो खऱ्या आयुष्यात खूप आगळावेगळा असल्याचं म्हटलं जातं. नवाजच्या आयुष्यावर लिहिलेल्या 'अॅन ऑर्डिनरी लाईफ' या पुस्तकात त्यानं स्वत:च्या खाजगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहे. ज्यात 'मिस लवली' च्या को-स्टारबरोबर चक्क 'वन नाईट स्टँड' केल्याचंही त्यानं कबूल केलं आहे. एवढं कमी की काय, तर त्याने न्यूयॉर्कमधील महिला वेटर बरोबरही 'वन नाईट स्टँड' केल्याचं सांगितलं आहे.



जाणून घेऊयात नवाजुद्दीनचं 'सिक्रेट लाईफ': 


निहारिकाशी संबंध:

नवाजुद्दीनने 'मिस लवली'च्या शूटिंगच्या दरम्यान को-स्टार निहारिकाला आपल्या घरी बोलावलं होत. त्याने तिच्यासाठी मटर पनीरचा बेत आखला. पण नंतर त्याला समजलं की मटर पनीर चविष्ट झालं नाही. त्या दिवशी निहारिकानेदेखील त्याला घरी येण्याचं निमंत्रण दिलं. नवाजुद्दीन निहारिकच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याला घरात सर्वत्र मेणबत्ती लावल्याचं दिसलं. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात 'सॉफ्ट नेट'चा फरवाला फ्रॉक घातलेली निहारिका उभी होती. ती फ्रॉक मध्ये खूपच सुंदर दिसत होती. नवाजुद्दीनने तिला पाहताच उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेला. त्यानंतर ते एकमेकांच्या खूप जवळ आले. हे नातं साधारण दीड वर्ष सुरु होतं.



न्यूयॉर्कच्या वेटरबरोबर:

नवाज एक दिवस न्यूयॉर्कच्या कॅफेत गेला होता. तिथे एका महिला वेटरची नजर सतत त्याच्यावर पडत होती. काही मिनिटानंतर त्या वेटरने नवाज ला 'तू अॅक्टर आहेस का'? असं  विचारलं. नवाजने तिला हो असं उत्तर दिलं आणि तू माझा कोणता सिनेमा पहिला आहेस? असं विचारलं. त्यावर तिने 'निहारिका सिंग' असं उत्तर दिलं. त्यानंतर त्यांच्यात गप्पा सुरु झाल्या. 'त्या' रात्रीचा उल्लेखही नवाजने पुस्तकात केला आहे.



या व्यतिरिक नवाजुद्दीनने आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा उल्लेख 'अॅन ऑर्डिनरी लाईफ' पुस्तकात केला आहे.



हेही वाचा -

नवाजुद्दीन सिद्दीकीला अखेर त्याची 'किंमत' कळली!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा