यासाठी सई जाणार अज्ञातवासात!

सई ताम्हणकर सर्व मोहजाळापासून सई कुठे तरी दूर अज्ञातवासात जाणार आहे. बसला ना आश्चर्याचा धक्का! होय, पण हे खर आहे.

SHARE

तरूण पिढीसाठी सई ताम्हणकर ही स्वत:च एक मराठमोळी ब्रँड बनली आहे. सईने खूप मेहनतीने हे सर्व कमावलं आहे. मराठीपासून हिंदीपर्यंत सर्वच ठिकाणी अभिनेत्री म्हणून सईच्या नावाचा दबदबा आहे. तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे, पण या सर्व मोहजाळापासून सई कुठे तरी दूर अज्ञातवासात जाणार आहे.


सोशल मीडियापासून दूर

बसला ना आश्चर्याचा धक्का! होय, सई खरंच अज्ञातवासात जाणार आहे, पण केवळ सोशल मीडियावर. वास्तव जीवनात मात्र ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या इव्हेन्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना भेटणार आहे हे ही तितकंच खरं आहे. मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई सध्या डिजीटल डिटॉक्सवर आहे. मराठी सिनेसृष्टीत २०१८ मधील स्टाइलिश लुक्स असोत, वा परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म्स... कुश्ती लीगमध्ये टीम विकत घेणं असो, वा स्टॅंडअप कॉमेडी करणं... या ना त्या कारणानं गेल्या वर्षी सई सातत्यानं चर्चेत राहिली होती, पण आता सई सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणार आहे.


यासाठी डिजीटल डिटॉक्स

सईला याविषयी विचारल्यावर ती म्हणाली की, ट्वीटर, इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर मी नेहमीच सक्रिय असते. मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला फार आवडतो, पण या धावपळीच्या जगात काही काळ स्वत:साठी मिळावा म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचा निर्णय घेतला आहे. मला स्वत:ला वेळ द्यायचा आहे. स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणायचे आहेत. यासाठी मी डिजीटल डिटॉक्स करण्याचं ठरवलं आहे.


निर्णयामागे मोठं कारण

सोशल मिडीयावर सईचे लाखो चाहते आहेत. सध्या सईचे इंस्टाग्रामवर साडेनऊ लाखांपेक्षा जास्त, तर ट्वीटरवर ७९ हजारांपेक्षा जास्त फोलोअर्स आहेत. या शिवाय फेसबुकवर तिचे १० लाखांपेक्षा अधिक फोलोअर्स आहेत. अशा वेळेस सईने अचानक डिजीटल डिटॉक्स करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामागे निश्चितच काहीतरी मोठं कारण असेल. या काळात ती नेमकं काय करणार आहे याबाबत लवकरच काहीतरी समजेल.


सर्वांना आश्चर्याचा धक्का

शोबिझमधले बरेच सेलिब्रिटी जेव्हा सोशल मीडियावर एक मिलीयन फॉलोअर्स मिळवण्याच्या जवळपास असतात. तेव्हा ते अधिकाधिक पोस्ट आणि अपडेट्स टाकून आपले फॉलोअर्स वाढवण्यावर भर देत असतात. सईने मात्र याउलट निर्णय घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सई नेहमीच हटके निर्णय घेण्यासाठी प्रचलित आहे. त्यामुळे ही देखील सईची एक बोल्ड मुव्ह असल्याचं म्हणायला हरकत नाही. मात्र सईच्या या निर्णयाने तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला असेल. एक महिन्यानंतर सई जेव्हा सोशल मीडियावर कोणतं नवं सरप्राइजेस घेऊन येते ते पाहायचं आहे.हेही वाचा -

शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप

कार अपघातात रैनाचा मृत्यू झाल्याची अफवासंबंधित विषय
ताज्या बातम्या