Advertisement

कार अपघातात रैनाचा मृत्यू झाल्याची अफवा

अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाचा कार अपघातात मृत्यू झाल्याच्या बातमीने क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवला. मात्र ही अफवा असल्याचं समजताच सर्वांना हायसं वाटलं.

कार अपघातात रैनाचा मृत्यू झाल्याची अफवा
SHARES

अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाचा कार अपघातात मृत्यू झाल्याच्या बातमीने क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवला. मात्र ही अफवा असल्याचं समजताच सर्वांना हायसं वाटलं.

नेहमीच दमदार फलंदाजीमुळं चर्चेत राहणारा भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाच्या बाबतीतील एक दु:खद बातमी सगळीकडे चर्चेचा विषय ठरली. वाऱ्याच्या वेगानं पसरलेल्या या बातमीबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर झापाट्यानं व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये रैनाचा अपघाती मृत्यू झाल्याचं दिसत. मात्र, ही अफवा असल्याचं रैनानं स्पष्ट केलं आहे.


निव्वळ अफवा

आपण सुखरूप असल्याचं सांगत आपल्या मृत्यूची बातमी ही निव्वळ अफवा असल्याचं रैनानं ट्विटरवर म्हटलं आहे. ‘माझ्या गाडीचा अपघात झाला आणि यामध्ये माझा मृत्यू झाल्याची अफवा पसरवली जात आहे. या अफवांमुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना नाहक त्रास होत आहे. अशा अफवांकडे दुर्लक्ष करा, मी या प्रकरणाची तक्रार दाखल करणार असून, अफवा पसरवणाऱ्यांवर लवकरच कारवाई होईल’, असं रैनानं म्हटलं आहे.



खेळावर लक्ष केंद्रित

मागील काही वर्षांपासून भारतीय संघातून सतत इन-आऊट होत असलेला रैना सध्या आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत आहे. आजवर त्यानं २२६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा केल्या आहेत. यासोबतच रैनानं ७८ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करताना १३४.८७ च्या स्ट्राइक रेटनं १६०५ धावा जमवल्या आहेत. याखेरीज तो भारताकडून १८ कसोटी सामनेही खेळला आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला रैना उत्तर प्रदेशच्या रणजी संघातून खेळत आहे. त्याशिवाय इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (आयपीएल) चैन्नई सुपर किंग्ज संघाचं प्रतिनिधीत्व करत आहे.



हेही वाचा -

EXCLUSIVE : सावधान! 'दलित पँथर' येतोय

आयसीसीच्या क्रमवारीत कुलदीप यादव दुसऱ्या स्थानी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा