Advertisement

EXCLUSIVE : सावधान! 'दलित पँथर' येतोय

'दलित पँथर' आता प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.

EXCLUSIVE : सावधान! 'दलित पँथर' येतोय
SHARES

केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात अनेक चळवळी उभ्या राहत त्यांनी इतिहास घडवला आहे. 'दलित पँथर' ही देखील एक अशीच चळवळ आहे जिने महाराष्ट्रासोबतच देशभरात आपला वैचारिक दबदबा निर्माण केला होता. आता हिच चळवळ रुपेरी पडद्यावर अवतरणार असल्याची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. होय, 'दलित पँथर' आता प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचे निर्माते-दिग्दर्शक-लेखक हर्ष मोहन कृष्णात्रेय यांनी 'मुंबई लाईव्ह'शी एक्सक्लुझिव्ह बातचित करताना या सिनेमाबाबतची सविस्तर माहिती दिली.

समीर सुर्वे दिग्दर्शित आणि मंगेश देसाई-तेजश्री प्रधान अभिनीत 'जजमेंट' या मराठी सिनेमाची निर्मिती हर्ष यांनी केली आहे. या सिनेमाच्या टीझर लाँच सोहळ्यात हर्ष यांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर, जे. व्ही. पवार (दलित पँथर संस्थापक-सदस्य, साहित्यिक), अर्जुन डांगळे (दलित पँथर सदस्य, साहित्यिक), अॅड, जयदेव गायकवाड (माजी आमदार, दलित पँथर सदस्य) आणि निर्माते डॅा. प्रल्हाद खंदारे यांच्या उपस्थितीत 'दलित पँथर' सिनेमाची घोषणा केली.


डॅाक्युमेंट्री मेकर हर्ष

हर्ष हे बेसिकली डॅाक्युमेंट्री मेकर आहेत. याशिवाय त्यांनी अशोक सराफ अभिनीत 'पकडापकडी' आणि मंगेश देसाईची मुख्य भूमिका असलेल्या 'जजमेंट' या मराठी सिनेमांची निर्मितीही केली आहे. 'दलित पँथर'च्या निमित्ताने प्रथमच दिग्दर्शनाच्या रिंगणात उतरणाऱ्या हर्ष यांनी 'आय अॅम नॅाट दलित' सारख्या सहा डॅाक्युमेंट्रीजचं दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन केलं आहे. 'दलित पँथर'चं लेखन हर्ष यांनी  केलं असून, दिग्दर्शनही तेच करणार आहेत. याखेरीज प्रल्हाद खंदारे यांच्या साथीने 'त्यांनी निर्मितीचीही जबाबदारी स्वीकारली आहे..


वर्षभरात प्रदर्शित

'दलित पँथर'च्या प्रोसेसबाबत 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना हर्ष म्हणाले की, मागील पाच वर्षांपासून मी पँथर मुव्हमेंटवर खूप रिसर्च केलं आहे. खूप माहिती गोळा केल्यानंतर ती सिनेमाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याची शक्ती निर्माण झाली आहे. आता या माहितीच्या आधारे मी हिंदी सिनेमा बनवणार आहे. 'जजमेंट' एप्रिल-मे मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 'दलित पँथर'च्या कामाला गती प्राप्त होईल. वर्षभरात हा सिनेमा चित्रीत करून प्रदर्शित करण्याची योजना आहे.


हिंदी-मराठीतील आघाडीचे कलाकार

दलित पँथर मुव्हमेंटशी निगडीत असलेल्या राजा ढाले यांचा सहवासही हर्ष यांना लाभला आहे. या सिनेमाबाबत ते म्हणाले की, ही चळवळ काय होती ते संपूर्ण देशाला माहित समजायला हवं हा हेतू आहे. सध्या खूपच प्राथमिक पातळीवर या सिनेमाची तयारी पूर्ण झाली आहे. अद्याप रिसर्च आणि लेखन प्रक्रिया सुरूच आहे. लेखन पूर्ण झाल्यावर एप्रिलनंतर सिनेमातील स्टारकास्ट फायनल करण्यात येईल. जून-जुलैनंतर सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या सिनेमात हिंदीतील आघाडीचे कलाकार असतील. यासोबतच मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांचाही समावेश यात असेल.


सिनेमा हिंदी, लुक मराठी

'दलित पँथर' हा मूळ सिनेमा हिंदीत बनवण्यात येणार आहे, पण लुक मात्र मराठमोळा असेल असं सांगत हर्ष म्हणाले की, या सिनेमाचं मूळ रूप हिंदीच असेल, पण स्टाईल आणि लुक मात्र महाराष्ट्रीय असेल. या सिनेमातील संगीतही महाराष्ट्रीय शैलीतील म्हणजे लोककलेशी निगडीत, अगदी महाराष्ट्राच्या मातीतील असेल. यात पोवाडा तर असेलच, पण त्याखेरील प्रसंगानुरूप इतर गाणीही असतील. चार गाणी करण्याचा विचार आहे. ही चार गाणी चार संगीतकारांकडून करून घेण्यात येतील. त्यामुळे वेगवेगळ्या संगीताचा जॅानर रसिकांना अनुभवायला मिळेल. ही डॅाक्युमेंट्री नसून 'दलित पँथर'चा इतिहास सांगणारा परीपूर्ण मनोरंजक सिनेमा असेल याची पूर्णत: काळजी घेण्यात येईल.


डॅा. बाबासाहेबही दिसतील

या सिनेमाच्या काळाबाबत आणि त्यातील ऐतिहासिक व्यक्तिरेखांबाबत सांगताना हर्ष म्हणाले की, दलित पँथर चळवळीला १९७२ चा बेस आहे, पण त्यापूर्वीचाही ही इतिहास या चळवळीला आहे. यात डॅा. बाबासाहेब आंबेडकरही असतील, पण ते कशा स्वरूपात असतील ते इतक्यात सांगणं खूप घाईचं ठरेल. योग्य वेळ येताच सर्व गोष्टींचा उलगडा करण्यात येईल. बाबासाहेबांच्या जोडीला नामदेव ढसाळ, राजा ढाले यांसारख्या इतरही काही ऐतिहासिक व्यक्तिरेखा या सिनेमात पाहायला मिळतील. त्यामुळे देश पातळीवर हा एक मोठा सिनेमा बनेल अशी आशाही हर्ष यांनी व्यक्त केली.



हेही वाचा - 

वाहतुक कोंडीमुळे आणखी २० विद्यार्थ्यांच्या करिअरला ब्रेक

अजब गणित! आठवडा एक, सिनेमे ५२?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा