Advertisement

वाहतूक कोंडीमुळे आणखी २० विद्यार्थ्यांच्या करिअरला ब्रेक

मुंबईतल्या वाहतूक कोंडीमुळे आणि त्यातच अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज माहिती नसल्यानं परीक्षेस पोहचण्यास ५ ते १० मिनिटं उशीर झाला. उशीर झाल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला.

वाहतूक कोंडीमुळे आणखी २० विद्यार्थ्यांच्या करिअरला ब्रेक
SHARES

अवघ्या काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे  ४० जणांच्या करीअरला ब्रेक लागला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे आणखी २० जणांना शासकीय नोकरीला हुकावे लागले आहे.


नेमक प्रकरण काय?

मुंबईत दररोज सरकारी आणि खासगी नोकऱ्यांसाठी परीक्षा होत असतात. त्यानुसार मंगळवारी १२ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता पी. डब्ल्यू. डी ही सिव्हिल इंजीनियरच्या पदासाठी परीक्षा घेण्यात येणार होती. वांद्रे परिसरातील थंडोमल शाहनी इंजीनियरिंग कॉलेज या केंद्रावर ही परीक्षा पार पडणार होती. या परीक्षेसाठी जळगाव, नाशिक, कोकण, पुणे यासारख्या विविध ठिकाणाहून विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी आले होते.

मात्र मुंबईतल्या वाहतुक कोंडीमुळे आणि त्यातच अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज माहिती नसल्यानं परीक्षेस पोहचण्यास ५  ते १० मिनिटं उशीर झाला. परीक्षेचा रिपोर्टिंग टाइम ९.३० असल्यानं अनेक विद्यार्थी ९.३५ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात पोहचले. मात्र उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला.


शिक्षणमंत्र्यांना ट्विट

विद्यार्थ्यांनी आपली चूक लक्षात घेत संबंधितांकडे परीक्षेला बसण्याची विनंती केली. पण ही विनंती चक्क धुकडावून लावण्यात आली. त्यामुळे हताश आणि निराश झालेल्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेकडे (अभाविप) धाव घेतली. घडलेल्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अभाविपनं आक्रमक पाऊल उचलत थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांना ट्विट केलं आहे.



शिक्षण विभाग मात्र झोपलेलं

यापूर्वी ३० जानेवारीला सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी न्यू इंडिया अॅश्यूरन्सच्या असिस्टंट आॅफिसरच्या पदासाठी पवईमधील एका परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार होती. परंतु जेव्हीएलआरवरील प्रचंड वाहतुक कोंडीमुळे तब्बल ४० जणांना या परीक्षेला बसता आल नव्हतं. आणखी किती विद्यार्थ्यांच्या करिअरला ब्रेक लागल्यानंतर शिक्षण विभागाला जाग येणार, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. 



हेही वाचा

आरटीई प्रवेशप्रक्रिया २५ फेब्रुवारीपासून

शाळेच्या आवारात कुत्र्याचा विद्यार्थ्यांवर हल्ला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा