Advertisement

शाळेच्या आवारात कुत्र्याचा विद्यार्थ्यांवर हल्ला

वडाळ्यातील एस.आय.डब्ल्यू.एस. या नामांकित शाळेच्या आवरातच विद्यार्थ्यांना कुत्रा चावल्यानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

शाळेच्या आवारात कुत्र्याचा विद्यार्थ्यांवर हल्ला
SHARES

मागील काही दिवसांपासून मुंबईत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे अनेक पादचाऱ्यांना कुत्रा चावण्याच्या घटनाही घडत आहे. परंतु वडाळ्यातील एस.आय.डब्ल्यू.एस. या नामांकित शाळेच्या आवरातच विद्यार्थ्यांना कुत्रा चावल्यानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मिथरा हसमुख (८) आणि देवांग हसमुख (७) अशी या चिमुरड्यांची नाव असून, सध्या त्यांच्यावर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


भटक्या कुत्र्याचा हल्ला

वडाळ्यातील एस.आय.डब्ल्यू.एस. या शाळेत मिथरा हसमुख (८) आणि देवांग हसमुख (७) ही दोन मुलं शिकत आहे. दुपारी १२.३० च्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ही मुलं शाळेच्या आवारात थांबली होती. तिथे बाहेरून आलेल्या एका भटक्या कुत्र्यानं या दोघांवर अचानक हल्ला केला. मिथराच्या ओठाला, तर देवांगच्या उजव्या हाताला कुत्र्यानं चावा घेतला. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं.


पालक चिंताक्रांत

दोन विद्यार्थ्यांना अँटी रेबिजचं इंजेक्शन देऊन घरी सोडण्यात आलं असून, आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. परंतु शाळेच्या आवारात घडलेल्या या घटनेमुळं विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचं वातावरण असून, यावर शाळा प्रशासनानं लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.हेही वाचा -

व्हॅलेंटाईन डेला तरी बोलेल का सलीलचा 'पक्या'?

शिमग्याला सिनेमागृहांमध्ये नाचणार कोकणातील 'पालखी'!संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा