शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप

इंडियन रेड क्रॉस सोसायटी(आयआरसीएस) या सामाजिक संस्थेनं पुढाकार घेत यंदा ६२ शाळांमधील ७ हजार पेक्षा जास्त विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.

  • शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप
SHARE

महिलांचा सर्वात संवेदनशील व कमी बोलला जाणारा विषय म्हणजे मासिक पाळी. आपल्याकडे आजही याबाबत तितकीशी जागरूकता नाही. याकरीता आता इंडियन रेड क्रॉस सोसायटी(आयआरसीएस) या सामाजिक संस्थेनं पुढाकार घेत शाळा व कॉलेजमधील मुलींमध्ये जनजागृती करण्याचं काम हाती घेतलं आहे. या अंतर्गत विविध शाळांच्या विद्यार्थिनींना दरमहा एक याप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन्सची १२ पॅकेट्स देण्यात आली आहेत.


मोफत सॅनिटरी पॅड

आयआरसीएसच्या वतीनं मुंबईतील विविध शाळांमध्ये दरवर्षी सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप करण्यात येतं. गेल्या वर्षी या संस्थेच्या वतीनं ५ हजार विद्यार्थिनीना नॅपकिन्स वाटण्यात आले असून यंदा ६२ शाळांमधील ७ हजार पेक्षा जास्त विद्यार्थिनींना मोफत नॅपकिन्स देण्यात आले. मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. शशिकला वंजारी, सुरेश देवरा, विजय कुमार सिंघल यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.महिला सध्या मासिक पाळी या विषयावर खुलेपणानं बोलू लागल्या असल्या तरीही अद्याप समाजातील दुर्बल घटकांपर्यंत याबाबत जागृती झालेली नाही. याखेरीज सॅनिटरी नॅपकिन्स महाग असल्यानं अनेक मुली व महिला कपड्याचा वापर करतात. ज्यामुळे विविध आजार होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हे चित्र बदलून महिलांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आयआरसीएसच्या वतीनं प्रयत्न करण्यात येत आहेत.


- शशिकला वंजारी, कुलगुरू, एसएनडीटी विद्यापीठहेही वाचा -

EXCLUSIVE : सावधान! 'दलित पँथर' येतोय

युथफूफ 'आम्ही बेफिकर' करणार प्रेक्षकांना 'बोफिकर'संबंधित विषय