युथफूल 'आम्ही बेफिकर' करणार प्रेक्षकांना 'बोफिकर'

कॉलेज गोईंग मित्रांची धमाल कथा असलेल्या 'आम्ही बेफिकर' या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. उत्तम छायांकन, धमाल कथा आणि चटपटीत संवादांमुळे ८ मार्चला प्रदर्शित होणारा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा सिनेमाच्या टिमकडून व्यक्त करण्यात येत आहे.

SHARE

मैत्री आणि प्रेम हे दोन विषय सिनेमेकर्सच्या आवडीचे असल्याने आतापर्यंत यावर बरेच सिनेमे बनले आहेत. परंतु, असं असलं तरी वर्तमान आणि भविष्यातही या विषयांवर सिनेमे बनतच राहतील यात शंका नाही. 'आम्ही बेफिकर' हा देखील असाच एक मराठी सिनेमा आहे, जो मैत्रीची कथा सांगत प्रेक्षकांनाही बेफिकर करण्यासाठी सज्ज झाला आहे.


मैत्रीची धमाल

'आम्ही बेफिकर' या सिनेमात प्रेक्षकांना मैत्रीची धमाल अनुभवायला मिळणार आहे. कॉलेज गोईंग मित्रांची धमाल कथा असलेल्या 'आम्ही बेफिकर' या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. उत्तम छायांकन, धमाल कथा आणि चटपटीत संवादांमुळे ८ मार्चला प्रदर्शित होणारा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा सिनेमाच्या टिमकडून व्यक्त करण्यात येत आहे. मैत्रीसोबतच या सिनेमात एक प्रेमकथाही गुंफण्यात आल्याचं टीझरवरून समजतं.


नवी जोडी

या चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांनी केलं आहे. सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी 'आम्ही बेफिकीर' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुयोग आणि मिताली यांनी आजवर मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ते प्रथमच एकत्र दिसणार आहेत. या दोघांच्या जोडीला या सिनेमात राहुल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके हे कलाकार धमाल-मस्ती करताना दिसणार आहेत. प्रणय अढांगळे यांनी या सिनेमातील गीतांना संगीत दिलं असून, चित्तरंजन ढाळ या सिनेमाचे डीओपी आहेत.


तरुणांशी संवाद साधणारा

खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावलं आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवलं, अशा आशयसूत्रावर या सिनेमाची कथा आधारलेली आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आहे. त्यामुळेच चित्रपटाचा लुकही यूथफुल असल्याचं टीजरमध्ये पहायला मिळतं. तरुणाईच्या डोळ्यांत अंजन घालत कर्तव्याची जाणीव करून देण्याचं काम हा सिनेमा करेल असं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा -

अजब गणित! आठवडा एक, सिनेमे ५२?संबंधित विषय
ताज्या बातम्या