अभिनेत्रीने वाचवले कासवाचे प्राण


  • अभिनेत्रीने वाचवले कासवाचे प्राण
SHARE

वर्सोवा - बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडल सौंदर्या गर्गने एका कासवाचे प्राण वाचवले आहेत. सौंदर्या शूटिंग संपल्यानंतर आपल्या राहत्या घरी वर्सोव्याला जात असताना कासवाला प्लॅस्टिकच्या पिशवीत कचऱ्यात फेकलेले पाहून ती चकित झाली. त्यावेळी तिने त्या कासवाला उचलून आपल्या घरी नेले.

ज्या प्राण्याला आपण आपल्या घरात इतक्या प्रेमाने पाळतो, त्याला खाऊ घालतो, त्याची काळजी घेतो, त्याला असं कचऱ्यात फेकताना काहीच का वाटत नाही? असा प्रश्न सौंदर्याने उपस्थित केला. कासवाची योग्य निगा राखली जावी आणि त्याला योग्य वातावरणात जगता यावे म्हणून सौंदर्याने प्लांट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे सचिव सुनीष कुंजू यांच्याशी संपर्क साधत कासवाला त्यांच्या स्वाधीन केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या