Advertisement

शाहरुखचे ट्विटरवर ३.३ कोटी फॉलोवर्स, चाहत्यांचे मानले आभार


शाहरुखचे ट्विटरवर ३.३ कोटी फॉलोवर्स, चाहत्यांचे मानले आभार
SHARES

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख सध्या भलताच खूश दिसत आहे. आणि त्याला कारणही तसंच आहे. ट्विटरवर सध्या त्याचे ३.३ कोटी इतके फॉलोवर्स झाले आहेत. त्यामुळे शाहरूखला आनंद पोटात मावेनासा झालाय. हा आनंद व्यक्त करण्यासाठी शाहरुखने त्याच्या ३.३ कोटी चाहत्यांसाठी खास व्हिडिओ देखील तयार केला आहे आणि तो व्हिडिओ त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. 

एकीकडे महानायक अतिताभ बच्चन यांचे ट्विटरवील फॉलोवर्स कमी झाल्याने सध्या ते नाराज आहेत. तर दुसरीकडे शाहरूख मात्र सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे.



या व्हिडिओत शाहरूखने आपल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी चक्क स्विमिंग पूलमध्ये उडी घेतली आहे. आणि स्विमिंगपूलमध्ये उडी घेण्यासाठी त्याने खास पेहरावही केला आहे. शाहरूखने महागडा सूट आणि काळ्या रंगाचा गॉगल यावेळी परिधाम केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना, मी कधीच नियोजन करून काम करत नाही. पण आज मात्र मी तुमच्यासाठी ठरवून एक गोष्ट करणार आहे. मी जे करतोय त्यात चूक बरोबर बघू नका. त्यामागच्या भावना कृपया समजून घ्या.



लवकरच शाहरूख 'झीरो' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. आनंद एल. राय. दिग्दर्शित 'झीरो' या चित्रपटात कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा