हे खरे स्वच्छ भारत अभियानातील हिरो

 Chembur
हे खरे स्वच्छ भारत अभियानातील हिरो

चेंबूर - दोन वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवस सर्वच ठिकाणी साफ-सफाई पहायला मिळाली. मात्र काही दिवसानंतर पुन्हा जैसे थे परिस्थती होती. मात्र चेंबूरच्या छेडानगरमधील काही राहिवाशांनी नरेंद्र मोदी यांची प्रेरणा घेऊन कैराली सेवा समितीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून हे स्वच्छता अभियान सुरुच ठेवले आहे. या समितीमधील सदस्य दर शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी आपल्या विभागाची नित्यनियमाने स्वच्छता करतात. दोन वर्षांपूर्वी सिनेअभिनेता श्रेयस तळपदे याच्या उपस्थितीत याठिकाणी ही सुरुवात झाली होती. यंदा दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देखील श्रेयस तळपदने पुन्हा याठिकाणी हजेरी लावली. त्याने हातात झाडू घेऊन छेडानगरमधील स्वछता अभियानात सहभाग घेतला. निसर्ग टिकवण्यासाठी स्वच्छतेची गरज असल्याचे यावेळी श्रेयस म्हणाला.

Loading Comments