Advertisement

‘पलटण’मध्ये रॅायल लुकमध्ये दिसणार सोनल


‘पलटण’मध्ये रॅायल लुकमध्ये दिसणार सोनल
SHARES

मागील काही दिवसांपासून दिग्दर्शक जे. पी. दत्ता आपल्या ‘पलटण’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. दत्तांचा सिनेमा म्हटला की बऱ्याच व्यक्तिरेखा आल्या. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा लुक हळूहळू रिव्हील केला जात आहे. या सिनेमात सोनल चौहानही एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे.


सोनलचा रॉयल लुक

‘पलटण’मधील सोनलचा लुक यापूर्वीच्या लुकपेक्षा खूप हटके आहे. वॅार ड्रामा असलेल्या या मल्टीस्टारर सिनेमात सोनलने राजपूत तरुणीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे या सिनेमात सोनलचा काहीसा रॅायल लुक पाहायला मिळणार आहे. 

Sonal Chauhan 1.jpg

या भूमिकेबाबत सोनल म्हणते की या व्यक्तिरेखेशी मी स्वत:ला रिलेट करते आहे. ‘पलटण’ हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्यानं यातील कॅरेक्टरही वास्तववादी वाटावं यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या सिनेमाच्या लुक टेस्टदरम्यान सिनेमाच्या टीमने राजस्थानमधील राण्यांचा संदर्भ डोळ्यांसमोर ठेवून आपल्याला तसा लूक देण्याचा प्रयत्न केल्याचंही सोनलचं म्हणणं आहे.


या कलाकारांच्या भूमिका

‘पलटण’मध्ये सोनलसोबत जॅकी श्रॅाफ, अर्जुन रामपाल, सोनू सूद, गुरमीत चौधरी, हर्षवर्धन राणे, सिद्धार्थ कपूर, लव्ह सिन्हा, इशा गुप्ता, दिपीका काकर, मोनिका गिल, अभिलाष चौधरी, अब्दुल आमिन आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाची कथा दत्ता यांनीच लिहीली असून, १९६२ मधील शिनो-इंडीयन वॅारवर आधारित आहे.


हेही वाचा - 

सचिन पिळगावकरांच्या हस्ते ‘पाटील’ चित्रपटाचं पोस्टर अनावरण

अभिनयासाठी ताजमधील नोकरीला ‘तिने’ ठोकला रामराम

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा