Advertisement

राणी लक्ष्मीबाईंच्या महालात स्पृहा

स्पृहानं राणी लक्ष्मीबाईंच्या महालाला भेट दिली आणि तिथलं शाही सौंदर्य न्याहाळलं. याचा एक व्हिडीओ शूट करून स्पृहानं सोशल मीडियावर पोस्टही केला आहे. राणीच्या महालाला भेट दिल्यावर स्फुरलेली कवीता स्पृहानं मागील आठवड्यात फेसबुकवर शेअर केली होती.

राणी लक्ष्मीबाईंच्या महालात स्पृहा
SHARES

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आणि मराठी रंगभूमीवरही लोकप्रिय असणारी अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या झाशी मुक्कामी आहे. तिथे स्पृहानं राणी लक्ष्मीबाईंच्या महालाला भेट देत शाही सौंदर्याचा आनंद लुटला आणि हाच आनंद तिनं व्हीडिओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवला आहे.


झाशी मुक्कामी 

स्पृहा मागील काही दिवसांपासून आपल्या आगामी चित्रपटाच्या कामानिमित्त झाशी मुक्कामी असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली आहे. त्यानंतर ती आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनसाठी श्रमदान करणार आहे. झाशीमध्ये जाणारा प्रत्येक पर्यटक राणी लक्ष्मीबाईंच्या महालाला अवश्य भेट देतो. त्यात स्पृहासारख्या कवीमनाच्या अभिनेत्रीला राणी लक्ष्मीबाईंच्या महालाला भेट देण्याचा मोह होणार नाही हे शक्यच नाही.


स्पृहानं केली कवीता

त्यानुसार स्पृहानं राणी लक्ष्मीबाईंच्या महालाला भेट दिली आणि तिथलं शाही सौंदर्य न्याहाळलं. याचा एक व्हिडीओ शूट करून स्पृहानं सोशल मीडियावर पोस्टही केला आहे. राणीच्या महालाला भेट दिल्यावर स्फुरलेली कवीता स्पृहानं मागील आठवड्यात फेसबुकवर शेअर केली होती. 'भग्न महालांतून वाजते सनई लोककथांची...' या कवितेसह तिनं आपला फोटोही पोस्ट केला होता.


व्हिडीओमध्ये महालाचं वैभव 

त्या पोस्टमध्ये स्पृहानं आपल्या मनातील विचार कवितेच्या माध्यमातून मांडले होते, पण आता तिनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राणीच्या महालाचं वैभव दाखवलं आहे. 'हॅलो, मित्रांनो... मी आता झाशीच्या राणी महलमध्ये आलीय...' असं म्हणत व्हीडिओ शूट करताना स्पृहानं महालातील लहानसहान गोष्टीही सांगितल्या आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या महालाच्या वैभवाचं वर्णन स्पृहाच्या मुखातून एकदा तरी ऐकायलाच हवं...



हेही वाचा -

EXCLUSIVE : मालवणी ‘शेवंता’ बनली भोजपुरी ‘भाभी’

आमिर खानच्या 'पाणी'साठी स्पृहा करणार श्रमदान




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा