Coronavirus cases in Maharashtra: 1141Mumbai: 686Pune: 139Navi Mumbai: 28Islampur Sangli: 26Kalyan-Dombivali: 25Ahmednagar: 25Thane: 24Nagpur: 23Pimpri Chinchwad: 17Aurangabad: 13Vasai-Virar: 10Buldhana: 8Latur: 8Satara: 6Panvel: 6Pune Gramin: 4Usmanabad: 4Yavatmal: 3Ratnagiri: 3Palghar: 3Mira Road-Bhaynder: 3Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Ulhasnagar: 1Gondia: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Akola: 1Total Deaths: 64Total Discharged: 79BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

आमिर खानच्या 'पाणी'साठी स्पृहा करणार श्रमदान

गतवर्षी स्पृहा पुरंदर तालुक्यातील पोखर या गावी श्रमदानासाठी गेली होती. श्रमदानाशिवाय पाणी फाउंडेशनच्या वर्षभर होणाऱ्या इतर कार्यक्रमांमध्येही स्पृहा सक्रिय सहभाग घेत असते. स्पृहा १ मे रोजी श्रमदान करणार आहे. त्यासोबतच तिच्या जोडीला मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी काही कलाकारही सामील होणार असल्याचं समजतं.

आमिर खानच्या 'पाणी'साठी स्पृहा करणार श्रमदान
SHARE

अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या झांसीमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. मात्र हे चित्रीकरण या आठवड्याअखेरीस आटोपून ती लवकरच परतणार आहे. यानंतर ती 'पाणी फाउंडेशन'च्या श्रमदानात आमिर खान आणि इतर मराठी कलाकारांसह सहभागी होणार आहे.


पोखरमध्ये श्रमदान

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गतवर्षी स्पृहा पुरंदर तालुक्यातील पोखर या गावी श्रमदानासाठी गेली होती. श्रमदानाशिवाय पाणी फाउंडेशनच्या वर्षभर होणाऱ्या इतर कार्यक्रमांमध्येही स्पृहा सक्रिय सहभाग घेत असते. स्पृहा १ मे रोजी श्रमदान करणार आहे. त्यासोबतच तिच्या जोडीला मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी काही कलाकारही सामील होणार असल्याचं समजतं.


इंडिया भारतात

मागच्या वर्षी केलेल्या श्रमदानाच्या अनुभवाविषयी स्पृहा म्हणाली की, मुंबई-पुण्यातल्या सुखासीन आयुष्याच्या बाहेर भयावह परिस्थितीत पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या लोकांचं जीवन पाणी फाउंडेशनच्या मोहिमेमुळं मला पाहायला मिळालं. पाणी फाउंडेशनसोबत दुष्काळाशी दोन हात करताना, पक्षीय राजकारणाच्या पलिकडं जाऊन संघटित होणारे, जातव्यवस्था मोडीत काढून, एकमेकांमधले पिढ्यान् पिढ्यांचे मतभेद विसरून, एकत्र पंगतीला बसणारे गावकरी मी पाहिले आहेत. मोठ्या शहरांमध्ये राहणारी सुखवस्तू कुटूंबातली उच्चशिक्षित मुलं, गावात येऊन कुदळ-फावडं घेऊन उन्हात घाम गाळताना पाहताना, इंडिया भारतात परतल्याचा सुखद अनुभव मिळतो.


मोहिम चळवळ बनली 

आजच्या काळात पाणी फाऊंडेशनचं काम खूप मोलाचं असल्याचं सांगत स्पृहा म्हणाली की, पाणी फाऊंडेशनची मोहिम आता चळवळ बनली आहे. पाणी फाउंडेशनसाठी काम करताना नैसर्गिक आपत्तीवर आपण मात करण्याचा आनंद मी गावकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहिला आहे. या आनंदात आपणही सहभागी असल्याचं समाधान काही आगळंच असतं. गेल्या वर्षी मी एकटीच श्रमदानासाठी गेले होते, पण यंदा मी माझ्या आई आणि काकूसोबत श्रमदानात सहभागी होणार आहे.
हेही वाचा  -

ही नवी कोरी जोडी नक्की

पहा, सईचा हटके लुक!
संबंधित विषय
संबंधित बातम्या