Advertisement

विकीच्या हेअर स्टाईलचं तरुणाईला ‘याड लागलं’

‘मनमर्जियां’ या सिनेमात विकीने विकी नावाच्याच तरुणाची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील त्याचं नाव जरी वास्तवातीलच असलं तरी दोघेही परस्पर विरोधी आहेत. या सिनेमात त्याने साकारलेला विकी मनमौजी आणि मस्तीखोर आहे. या सिनेमातील मस्तीखोर विकीची हेअर स्टाईल खूप वेगळी आहे.

विकीच्या हेअर स्टाईलचं तरुणाईला ‘याड लागलं’
SHARES

हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यापासूनच अभिनेता विकी कौशलने स्वत:ची एक वेगळी शैली निर्माण केली आहे. याच बळावर अल्पावधीतीच त्याने आपला वेगळा चाहतावर्गही निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. ‘संजू’ सिनेमामध्ये त्याने साकारलेल्या कमलीने यात आणखी भर घालण्याचं काम केलं आहे. सध्या ‘मनमर्जियां’ या सिनेमामुळे चर्चेत असलेल्या विकीच्या या सिनेमातील हेअर स्टाईलने तरुणाईला वेड लावलं आहे.


मस्तीखोर विकी

‘मनमर्जियां’ या सिनेमात विकीने विकी नावाच्याच तरुणाची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील त्याचं नाव जरी वास्तवातीलच असलं तरी दोघेही परस्पर विरोधी आहेत. या सिनेमात त्याने साकारलेला विकी मनमौजी आणि मस्तीखोर आहे. या सिनेमातील मस्तीखोर विकीची हेअर स्टाईल खूप वेगळी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने विकीने प्रथमच आपले केस रंगवले आहेत. केवळ एकाच रंगात नव्हे तर बऱ्याच रंगांमध्ये. याखेरीज त्यात नक्षीकामही करण्यात आलं आहे. विकीच्या केसांमध्ये एक फुल कोरण्यात आलं आहे. या फुलामुळेच विकीची या सिनेमातील हेअर स्टाईल तरुणाईला भुरळ घालत असल्याचं बोललं जात आहे.


१४ सप्टेंबरला प्रदर्शित

‘मनमर्जियां’च्या ट्रेलर आणि गाण्यांमध्ये विकीची ही अनोखी हेअर स्टाईल पाहायला मिळत आहे. तरुणाई ही हेअर स्टाईल काॅपी करत आहे. त्यामुळे हेअर कटिंग सलून्समध्ये विकीच्या हेअर स्टाईलची डिमांड वाढल्याचं समजतं. एकूणच विकीने केवळ आपल्या अभिनयानेच नव्हे, तर स्टायलिश लुक आणि हेअर स्टाईलनेही आपल्या चाहत्यांवर जादू केल्याचं चित्र दिसतं. या सिनेमात विकीसोबत अभिषेक बच्चन आणि तापसी पन्नू हे दोन तगडे कलाकार मुख्य भूमिकेत असूनही, सध्या चहू बाजूंना विकीचेच वारे वाहात आहेत. अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा १४ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

...आणि शाहिदने गिफ्ट दिली स्वत:ची जिम

‘लव्ह सोनिया’ने सजग नागरिक बनवलं : सई ताम्हणकर
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा