Advertisement

...आणि शाहिदने गिफ्ट दिली स्वत:ची जिम

शाहिद सध्या दिग्दर्शक नारायण सिंग यांच्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचं चित्रीकरण संपल्यानंतर ‘बत्ती गुल मीटर चालू’च्या टीमला शाहिदचं एक नवीन रुप पाहायला मिळालं.

...आणि शाहिदने गिफ्ट दिली स्वत:ची जिम
SHARES

अलीकडच्या काळात काहीसा चूझी बनलेला अभिनेता शाहिद कपूर ‘पद्मावत’ या सिनेमानंतर खूप बदलल्याचं बोललं जात आहे. त्या सिनेमातील राजा रतन सिंगप्रमाणे वासत्वातही शाहिद काहीसा दयाळू, कनवाळू, कृपाळू झाल्याचं बोललं जात होतं, पण त्याचा प्रत्यय ‘बत्ती गुल मीटर चालू’ या सिनेमाच्या निमित्ताने टेहरी गावातील लोकांना आला.

शाहिद सध्या दिग्दर्शक नारायण सिंग यांच्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचं चित्रीकरण संपल्यानंतर ‘बत्ती गुल मीटर चालू’च्या टीमला शाहिदचं एक नवीन रुप पाहायला मिळालं.

या सिनेमाचं शूटिंग जेव्हा उत्तराखंडमधील टेहरी भागात सुरू होतं, तेव्हा शाहिद तिथे एका हाॅटेलमध्ये मुक्कामाला होता. या हाॅटेलमध्ये ऐशोआरामाच्या फारशा सुविधा नव्हत्या. शाहिद आपल्या फिटनेसबाबत खूप सजग असतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. ज्या हाॅटेलमध्ये तो राहायला होता, तिथे जिमही नव्हती. यावर नाराज न होता शाहिदने मुंबईहून स्वत:चा जिम सेटअप मागवला. शाहिदच्या जिम ट्रेनरने सर्व साधनं मुंबईहून टेहरीमध्ये नेली.


जिम सेटअप गिफ्ट दिलं

शूटिंगच्या कालावधीत शाहिदने या जिमच्या सहाय्यानेच स्वत:ला फिट ठेवलं. सिनेमाचं शूटिंग पॅक अप होण्यापूर्वी हाॅटेलमधील एका व्यक्तीने शाहिदला जिम सेटअप इथेच ठेवण्याची विनंती केली. हा सेट अप टेहरीची भटकंती येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि हाॅटेलमधील पाहुण्यांसाठी उपयोगी ठरेल, असं त्या व्यक्तीचं म्हणणं होतं. शाहिदलाही त्याचे विचार पटले आणि त्याने चक्क आपला जिम सेटअप गिफ्ट दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.


शाहिदचं नवं रुप प्रेक्षकांसमोर

एकूणच या किस्स्याद्वारे शाहिदचं नवं रुप प्रेक्षकांसमोर आलं आहे. त्यामुळे अर्थातच या सिनेमातील शाहिदचं रुप पाहण्याची उत्सुकताही वाढणार आहे. या सिनेमात शाहिदच्या जोडीला श्रद्धा कपूर, यामी गौतम आणि दिव्येंदु शर्मा यांच्याही भूमिका आहेत. टी सिरीज आणि कृती पिक्चरची निर्मिती असलेला हा सिनेमा २१ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा -

शाहिद स्वत:ला मानतो लकी!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा