Advertisement

आधी धमाकेदार कमबॅक, आता वेबसाईटवर किस्से!


आधी धमाकेदार कमबॅक, आता वेबसाईटवर किस्से!
SHARES

सिनेसृष्टीची चंदेरी दुनिया जितक्या लवकर एखाद्या चेहऱ्याला प्रकाशझोतात आणते, तितक्याच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक वेगाने अंधारातही टाकू शकते. तुम्ही जरा प्रसिद्धीपासून दूर गेलात, की तुमचा प्रेक्षकांना विसर पडलाच म्हणून समजा! पण मराठी चित्रपटसृष्टीतलं असं एक नाव आहे, जे प्रसिद्धीच्या वलयापासून दूर जाऊनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिलं. ते नाव म्हणजे अश्विनी भावे!

अश्विनी भावेच्या बहुधा सर्वच भूमिकांना प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. लग्नानंतर ती अमेरिकेमध्ये स्थायिक झाली. गेल्याच वर्षी ती भारतात परतली आणि तिने कारकिर्दीला नव्याने सुरुवात केली. या वर्षी अश्विनी भावेने भूमिका निभावलेले 'ध्यानीमनी' आणि 'मांजा' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. दोन्ही सिनेमांमधल्या तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंतीची थाप मिळाली. 

काही दिवसांपूर्वीच अश्विनी भावेने लाल गाऊनमधला तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यावर चर्चा सुरु झाली. हा फोटो अश्विनीने नेमका का अपलोड केला असावा? तिने हे ग्लॅमरस फोटोशूट नक्की का केलं असावं? अशा अनेक चर्चा तिच्या चाहत्यांनी सुरु केल्या. मात्र अखेर तिच्या या फोटोशूटचं कोडं उलगडलं. 

अश्विनी भावेने नुकतीच तिची स्वत:ची वेबसाईट लाँच केली आहे. www.ashvinibhave.com ही तिची वेबसाईट असून या वेबसाईटचं प्रमुख आकर्षण म्हणजे अश्विनी भावेचे एक्सक्लुझिव्ह फोटो!


 

या वेबसाईटमध्ये तिचं संपूर्ण आयुष्य फोटोंच्या माध्यमातून पहाता येणार आहे. तिच्या किशोरवयापासून ते आत्तापर्यंत तिच्या आयुष्यात घडलेल्या सर्व घडामोडींची नोंद या वेबसाईटवर आहे. तिने केलेले चित्रपट, भूमिका आणि त्यातील छायाचित्र या सगळ्याचा त्यात समावेश आहे. या वेबसाईटवर तिने ४ वेगवेगळ्या कथांचा समावेश केला आहे. त्यात तिने भूमिका केलेल्या 'हिना', 'हळद रुसली, कुंकू हसलं' या चित्रपटांदरम्यान घडलेले किस्से दिलेले आहेत.





डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा