Advertisement

परिणीती म्हणतेय 'हम नहीं सुधरेंगे'!


परिणीती म्हणतेय 'हम नहीं सुधरेंगे'!
SHARES

बॉलीवूड कलाकार परिणीती चोप्रा रविवारी २९ वर्षांची होणार आहे. आणि तिच्या वाढदिवसाआधीच निर्माता रोहित शेट्टीने तिला तिचं बर्थडे गिफ्ट दिलं आहे. रोहितच्या 'गोलमाल अगेन' या सिनेमासाठी ती 'हम नहीं सुधरेंगे' या लोकप्रिय गाण्याचं नवीन वर्जन गाणार आहे.



परिणीती चोप्रा नुकतीच सिनेमाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगन, अरशद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि कुणाल खेमू यांच्या बरोबर 'यार मेरा सुपरस्टार सीजन 2' मध्ये 'गोलमाल अगेन' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. हा सिनेमा शुक्रवारी(20 ऑक्टोबर) प्रदर्शित झाला. कार्यक्रमाच्या वेळी रोहित शेट्टीने सांगितलं की, 'परिणीतीने पूर्ण सिनेमा होईपर्यंत मला हे विचारून त्रास दिला की मी हे गाणं गाऊ शकते का?' त्यामुळे आता परिणीतीसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. टी-सिरीज या कंपनीने ही ऑफर परिणीतीला दिली आहे.



हेही वाचा

'सोनु तुझा मायावर...' गाणं गाणारा अवलिया!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा