• आदिवासी संस्कृतीचा वारसा दर्शवणारं प्रदर्शन
SHARE

प्रभादेवी - पु.ल.देशपांडे अकादमी आणि रविंद्र नाट्यमंदिर इथं आदिरंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 29 ते 31 डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. पु.ल. देशपांडे कला अकादमी आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली यांनी हा महोत्सव आयोजित केलाय. देशातील 450 आदिवासी कलाकारांचा यामध्ये समावेश असणार आहे. या महोत्सवाच्या निमित्तानं आदिवासी संस्कृती आणि कला लोकांना पाहायला मिळणार आहे. भारतीय आदिवासी संस्कृतीचा वारसा दर्शवणारं प्रदर्शन हा देखील या महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या