‘एडल्ट्स ओन्ली’

Mumbai
‘एडल्ट्स ओन्ली’
‘एडल्ट्स ओन्ली’
See all
मुंबई  -  

मुंबई - मराठीत पहिल्यांदाच सेक्स कॉमेडी जॉनरचा सिनेमा येणार आहे. ‘एडल्ट्स ओन्ली’ असं या सिनेमाचं नाव असून त्याचा पोस्टर नुकताच रिलीज झालाय. यापूर्वी हिंदीमध्ये असे अनेक सिनेमे आलेत. मात्र मराठीत पहिल्यांदाच अशा धाटणीचा सिनेमा येत आहे.

सिनेमाचे पोस्टर खूप युनिक आहे. दिग्दर्शक मिलिंद अरूण कवडे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. मिलिंद कवडे यांनी फेसबुक प्रोफाईलवर सिनेमाचा पोस्टर शेअर केलाय. "2017 च्या शुभ मुहूर्तावर ‘ऍडल्टस ओन्ली’ या माझ्या नवीन सिनेमाचा टिझर पोस्टर खास तुमच्यासाठी… ‘फक्त प्रौढांसाठी’ असलेली मराठीतील पहिली ‘सेक्स कॉमेडी’ लवकरच घेऊन येतोय खास प्रौढ प्रेक्षकांसाठी… प्रौढांनी लाईक, कमेंट आणि शेअर करण्यास काहीच हरकत नाही’, असा संदेश त्यांनी चाहत्यांसाठी दिलाय. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या सिनेमाबद्दल आणखीनच उत्सुकता वाढली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.