Advertisement

सलमान खान कुटुंबीयं चिंतेत, घरातील छोटा सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह

करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या.

सलमान खान कुटुंबीयं चिंतेत, घरातील छोटा सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानलादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खानचा मुलगा योहान खानलादेखील कोरोनाची लागण झाली आहे.

सलमान खानचा १० वर्षीय पुतण्या योहान खानला कोरोनाची लागण झाली आहे. सोहेल खानची इमारत आता कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) सील केली आहे.

करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत, त्या सर्वांची आता कोरोना चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागानं सुरवात केली आहे.

दोन्ही अभिनेत्री बॉलिवूड पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे त्या सूपर स्प्रेडर ही ठरू शकण्याची शक्याता सूत्रांनी व्यक्त केली आहे. करीना आणि अमृता यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पालिकेनं कोरोना चाचणी केली आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून करण जोहर आणि करीना कपूर यांच्यावर पार्टी करून कोरोना पसरवल्याचा आरोप केला जातोय. करीना कपूरनंतर आता करण जोहरनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्पष्टीकरण दिलं आहे.

करणनं सांगितलं की, त्याचा आणि कुटुंबाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांच्या घरी फक्त ८ लोकांची गँदरिंग होती. कोणतीही पार्टी तिथे आयोजित करण्यात आली नव्हती.

करणनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यानं लिहिलं- “मी मुंबई महापालिकेनं घेतलेल्या सर्व प्रयत्नांचे आणि शहर सुरक्षित ठेवणाऱ्या सर्वांचेच मनापासून कौतुक करतो. त्यांना माझा सलाम. दरम्यान मी माझ्या काही मीडियाच्या सदस्यांना स्पष्टीकरण देऊ इच्छितो की ८ लोकांच्या एकत्रित येण्याला पार्टी म्हणत नाही. माझ्या घरात कोविडचे सर्व प्रोटोकॉल पाळले जातात. त्यामुळे ते निश्चितच कोरोनाचे हॉटस्पॉट असू शकत नाही. आम्ही सर्व जबाबदार लोक आहोत. आम्ही प्रत्येकवेळी मास्क घालतो. कोणीही कोरोना महामारीला हलक्यात घेतलेले नाही. त्यामुळे मी प्रसारमाध्यामांच्या काही सदस्यांना थोडा संयम ठेवण्याचे आवाहन करतो. त्यांनी तथ्य नसलेले वृत्त देणे टाळावे, अशी विनंतीही करतो,” असे करण जोहर म्हणाला.हेही वाचा

करण जोहर म्हणाला, "८ लोकांच्या एकत्रित येण्याला पार्टी म्हणत नाही"

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा