अर्जुन कपूरलाही पालिकेची नोटीस

 Juhu
अर्जुन कपूरलाही पालिकेची नोटीस
Juhu, Mumbai  -  

जुहू - हास्य कलाकार कपिल शर्मानंतर पालिकेनं आता अभिनेता अर्जुन कपूरलाही नोटीस पाठवली आहे. जुहूतल्या अवैध बांधकामासाठी के पश्चिम विभागाच्या अतिक्रमण विभागानं ही नोटीस बजावलीय. अर्जुन कपूरनं रहेजा ऑर्किड इमारतीतल्या सातव्या मजल्यावरील घराच्या गच्चीत आणखी एक खोली बनवलीय. पालिकेनं यापूर्वी दोनदा नोटीस बजावल्या होत्या. मात्र नोटीसला उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे तिसऱ्या नोटीसनंतर पालिका आता थेट कारवाई करण्याच्याच विचारात आहे. हे घर बोनी कपूर यांनी बनवलं असून अर्जुन कपूरच्या नावावर त्यांनी केले आहे. अर्जुनच्या या घरात सध्या रोहीत शेट्टी राहत आहे.

Loading Comments