Advertisement

७ वर्षांनी चंद्रकांत कुलकर्णींचं अभिनयात पुनरागमन!

नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या काकांची भूमिका कुलकर्णींनी साकारली आहे. ही सुनीलच्या खूप जवळची आणि त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असलेली व्यक्तिरेखा आहे. या चित्रपटातही कुलकर्णी यांनी एका दिग्दर्शकाचीच भूमिका साकारली आहे.

७ वर्षांनी चंद्रकांत कुलकर्णींचं अभिनयात पुनरागमन!
SHARES

प्रत्येक दिग्दर्शकांच्या अंगी अभिनयाची कलाही असते; परंतु सर्व दिग्दर्शकांच्या आत दडलेल्या या कलेला वाव मिळतोच असं नाही. राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मात्र जेव्हा संधी मिळाली, तेव्हा आपल्यातील कलाकाराला वाव दिला आहे. आता ते अभिनेता स्वप्नील जोशीसोबत ‘मोगरा’ फुलवताना दिसणार आहेत.


मोगरा फुलला

गंमतीचा भाग सोडा, पण आता चंद्रकांत कुलकर्णी खरोखर अभिनय करताना दिसणार आहेत. त्यांच्या अभिनयानं सजलेल्या आगामी चित्रपटाचं शीर्षकही ‘मोगरा फुलला’ असं काहीसं सुगंधी आहे. या चित्रपटात त्यांनी स्वप्नीलच्या काकांची भूमिका साकारली आहे. नाट्य आणि सिने दिग्दर्शक अशी चंद्रकांत कुलकर्णी यांची खरी ओळख आहे. असं असलं तरी त्यांनी चेहऱ्याला मेकअप करून कॅमेराही फेस केल्याचं आपण पाहिलं आहे.


पिपाणीत शेवटचा अभिनय

१९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अमोल पालेकर दिग्दर्शित ‘बनगरवाडी’ चित्रपटामध्ये कुलकर्णी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. यात त्यांनी साकारलेले शाळेतील मास्तर खूप गाजले. ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याआधी त्यांनी १९९४ मध्ये महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी', `मग्न तळ्याकाठी' आणि `युगान्त' या त्रिनाट्याचं दिग्दर्शन केलं. चार मध्यांतरासह सलग नऊ तासांचा हा विक्रम नाट्यप्रयोग ठरला होता. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पिपाणी’ या चित्रपटात कुलकर्णी यांना शेवटचा अभिनय केला होता. त्यानंतर जवळजवळ सात वर्षांनी त्यांनी ‘मोगरा फुलला’ या चित्रपटात अभिनय केला आहे.


लेखकाचा विश्वास 

एका मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा अभिनय करण्याबाबत कुलकर्णी म्हणाले की, सिनेमा आणि नाट्यसृष्टीत माझी ओळख एक दिग्दर्शक म्हणूनच आहे. एखादा दिग्दर्शक किंवा लेखक ज्यावेळी एखादा चित्रपट करत असतो, त्यावेळी त्याला एखादी व्यक्तिरेखा मीच साकारू शकतो असा ठाम विश्वास वाटतो, तेव्हा मी ती स्वीकारतो. तसंच काहीसं ‘मोगरा फुलला’ या चित्रपटाच्या बाबतीत झालं आहे. सिनेमाचे लेखक सचिन मोटे यांना असा ठाम विश्वास होता की, ‘मोगरा फुलला’मधील नाट्य दिग्दर्शकाची भूमिका फक्त चंद्रकांत कुलकर्णी साकारू शकतात, म्हणूनच मी हा चित्रपट केला.


दिग्दर्शकाचीच भूमिका

नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या काकांची भूमिका कुलकर्णींनी साकारली आहे. ही सुनीलच्या खूप जवळची आणि त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असलेली व्यक्तिरेखा आहे. या चित्रपटातही कुलकर्णी यांनी एका दिग्दर्शकाचीच भूमिका साकारली आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांनी ‘मोगरा फुलला’चं दिग्दर्शन केलं आहे. 


१४ जूनला प्रदर्शित

या चित्रपटात स्वप्नील आणि कुलकर्णींच्या जोडीला सई देवधर, नीना कुळकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा -

रिंकूच्या ‘कागर’चा ट्रेलर पाहिला का?

उपेंद्रच्या उपस्थितीत ‘बाळा’चं संगीत प्रकाशन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा