Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

उपेंद्रच्या उपस्थितीत ‘बाळा’चं संगीत प्रकाशन

भारतीयांच्या जिव्हाळयाचा विषय असलेल्या क्रिकेट आणि चित्रपट या दोन गोष्टी ‘बाळा’ या मराठी चित्रपटामध्ये जुळून आल्या आहेत. या दोन्ही गोष्टी आपली आवड म्हणून जपणारे अनेकजण असतील. मात्र त्याला आपल्या निर्धाराची जोड देत ती पूर्ण करणारे फार कमी असतात.

उपेंद्रच्या उपस्थितीत ‘बाळा’चं संगीत प्रकाशन
SHARES

मराठीपासून हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेला राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता उपेंद्र लिमये आता ‘बाळा’ या आगामी मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं संगीत प्रकाशन नुकतंच उपेंद्रच्या उपस्थितीत करण्यात आलं.


क्रिकेटवेड्या बाळाची गोष्ट

भारतीयांच्या जिव्हाळयाचा विषय असलेल्या क्रिकेट आणि चित्रपट या दोन गोष्टी ‘बाळा’ या मराठी चित्रपटामध्ये जुळून आल्या आहेत. या दोन्ही गोष्टी आपली आवड म्हणून जपणारे अनेकजण असतील. मात्र त्याला आपल्या निर्धाराची जोड देत ती पूर्ण करणारे फार कमी असतात. आगामी 'बाळा' या चित्रपटातही क्रिकेटवेड्या बाळाची व त्याच्या निर्धाराची, स्वप्नांची गोष्ट उलगडणार आहे. 


३ मे रोजी प्रदर्शित

३ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा उपेंद्रसह ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि कमलेश सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गीतकार विजय गमरे यांनी ‘लाडल्या रे लाडल्या…’, ‘विठ्ठला…’, ‘दिमाग ढिला…’, ‘जिंकूया खेळूया…’ ‘हल्ला गुल्ला…’ अशी वेगवेगळ्या जॉनरची चार गाणी ‘बाळा’साठी लिहिली आहेत. सोनू निगम, आदर्श शिंदे, रोहित राऊत, निहार शेंबेकर, उर्मिला धनगर या गायकांनी ही गाणी गायली आहेत. यावर विष्णू देवा, हबीबा रेहमान, फुलवा खामकर यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.


पोलिस अधिकाऱ्याची भूमिका

या चित्रपटाबाबत उपेंद्र म्हणाला की, क्रिकेटवर आधारित असलेल्या या चित्रपटातील गाणी छान झाली आहेत. क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलाची ही कथा आहे. यात मी एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ज्याला आपल्या मुलाला आयपीएस अधिकारी बनवायचं असतं, पण मुलाला मात्र क्रिकेटचं वेड असतं. याच्या मनात मात्र क्रिकेटबाबत घृणा असते. त्यातूनही हा मुलगा कशा प्रकारे आपलं स्वप्नांचा पाठलाग करत यशस्वी ठरतो याची कथा या चित्रपटात आहे.


जिद्दी मुलाची कथा

विक्रम गोखले यांनी या चित्रपटात बाळाच्या आजोबांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या जोडीला सुहासिनी मुळ्ये, क्रांती रेडकर, कमलेश सावंत या मातब्बर कलाकारांच्या भूमिका आहेत. मिहीरीश जोशी या नव्या चेहऱ्यासह यशवर्धन–राजवर्धन, आशिष गोखले, ज्योती तायडे या बाल कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन सचिंद्र शर्मा यांनी केलं आहे. ‘बाळा’ हा चित्रपट फक्त क्रिकेटवरच आधारलेला नसून, स्वप्न उराशी बाळगून, त्या मार्गानं प्रयत्न करणाऱ्या एका जिद्दी मुलाची कथा सांगणारा असल्याचं शर्मा म्हणाले.

लिंक : https://www.youtube.com/watch?v=3yFy88sllr0&feature=youtu.beहेही वाचा -

Movie Review : प्री-वेडींग शिनेमाची धमाल गोष्ट
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा