अक्षयचा 'जबरा फॅन'

 Juhu
अक्षयचा 'जबरा फॅन'
Juhu, Mumbai  -  

मुंबई - बॉलीवूड कलाकारांच्या चाहत्यांचे त्यांच्या आवडत्या कलाकारासाठी असलेले प्रेम बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळते. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्यासोबतही असेच काहीसे झाले आहे. अक्षय कुमारचा हा चाहता त्याला भेटण्यासाठी हरिद्वारवरून मुंबईला सायकलवरून आला. याबाबतची माहिती अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. इतकेच नव्हे तर त्याचा हा चाहता त्याच्यासाठी हरिद्वारवरून गंगाजलही घेऊन आला. अक्षयने त्याच्या चाहत्यासोबतचा फोटो शेअर करत म्हटले की, "हा व्यक्ती हरिद्वार येथून सायकलवरून मला भेटण्यासाठी आला. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो, कृपया असे काही करू नका," असा मेसेजही अक्षयने फोटोखाली दिलाय.

Loading Comments