Advertisement

आलिया जेव्हा अमृताला भेटवस्तू पाठवते...!


आलिया जेव्हा अमृताला भेटवस्तू पाठवते...!
SHARES

मराठीतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी 'अमृता खानविलकर' सध्या बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकतेच अमृताने ट्विटर वर 100k फॉलोवर झाले म्हणून तिच्या चाहत्यांचे आभार मानले. अमृता खानविलकर मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी 'राझी' या चित्रपटामध्ये झळकणार असल्याची खूप आधीपासूनच चर्चा होती. या चित्रपटात अमृता आलिया भट सोबत काम करत आहे.



नुकतंच या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं, असं अमृता खानविलकरने तिच्या मुलाखतीत सांगितले आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलिया आणि माझी मैत्री अधिक वाढली, हे देखील अमृताने आपल्या मुलाखतीत म्हटले आहे. आणि याचा ठोस पुरावा म्हणजे आलियाने अमृताला पाठवलेली एक भेट वस्तू. ज्यात आलियाने अमृताला स्वतःच्या हाताने लिहिलेलं एक छोटंसं आभारपत्र आणि काही सुंदर भेटवस्तू पाठवल्या आहेत.

 


हे पाहून अमृता अगदी भारावून गेली. अमृताने सोशल मीडियावर या बाबत पोस्ट ही शेअर केली आहे, ज्यात ती म्हणतेय, "आलिया कडून मिळालेली भेट अविस्मरणीय आहे. तिच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. तिच्यात असलेलं विशेष कौशल्य अगदी कौतुकास्पद आहे. 'राझी' हा माझ्यासाठी खूप छान आणि वेगळा अनुभव आहे. परंतु, तुझी भेटवस्तू अविस्मरणीय आहे. और ये करके आपने उसपे मोहर लगा दी.."



हेही वाचा

'डान्स इंडिया डान्स'ची नवी सूत्रसंचालक..अमृता खानविलकर!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा