Advertisement

'डान्स इंडिया डान्स'ची नवी सूत्रसंचालक..अमृता खानविलकर!


'डान्स इंडिया डान्स'ची नवी सूत्रसंचालक..अमृता खानविलकर!
SHARES

काही दिवसांपूर्वी 'मुंबई लाईव्ह'ने तुम्हाला 'डान्स इंडिया डान्स' सीझन ६ चा सूत्र संचालक साहिल खत्तर असेल अशी माहिती दिली होती. पण आज आम्ही तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगणार आहोत. साहिल खत्तर याच्याबरोबरच डान्सर आणि मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर 'डान्स इंडिया डान्स ६' या शोचं सूत्र संचालन करणार आहे आहे! आणि या बातमीवर खुद्द अमृतानेही शिक्कामोर्तब केलं आहे.

होय, मी शोचं सूत्र संचालन करीत आहे आणि 1 ऑक्टोबर 2017 पासून शूट सुरू करणार आहे. मी 'डान्स इंडिया डान्स'चा एक भाग होण्यास उत्सुक आहे. कारण डान्स ही अशी गोष्ट आहे, ज्याच्यावर मी खूप प्रेम करते आणि मी ते कधीही एन्जॉय करू शकते.

अमृता खानविलकर, अभिनेत्री-डान्सर


रिअॅलिटी शोच्या अनुभवाविषयी काय सांगशील?

नच बलिये आणि इतर डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्यामुळे मला खूप वेगळा अनुभव मिळाला. लहान मुलं आणि प्रतिस्पर्धी खूप लवकर निराश होतात. माझ्या अनुभवामुळे, मी त्यांना सांगू इच्छिते, की जीवन आणि प्रवास या गोष्टी शोनंतर ही सुरूच राहतात. मला मुलांना भविष्यामध्ये येणाऱ्या संधींबद्दल प्रोत्साहित करायला नक्कीच आवडेल.'

डान्स इंडिया डान्स मधून काय शिकलीस?

गाण्याचे बोल लक्षात ठेवणं सोपं आहे. त्यापेक्षा मला वेगवेगळ्या शैलीचे नृत्य प्रकार शोधायला जास्त आवडेल. डान्स इंडिया डान्स मध्ये मला लॉकिंग आणि पॉपिंग शिकण्याची इच्छा आहे. कारण हे प्रकार मला खूप जास्त आवडतात. ज्या प्रकारे राघव नाचतो ते मला खूप आवडतं. त्याची शैली खूप वेगळी आणि मस्त आहे. मला असे प्रकार 'डान्स इंडिया डान्स ६' मध्ये शिकायला नक्कीच आवडतील आणि जमलं तर करायलाही आवडेल.

या शोमधून चांगल्या कोरिओग्राफर्ससोबत काम करायला मिळेल...

'डान्स इंडिया डान्स' मध्ये नृत्य दिग्दर्शकाला शोचा परीक्षक होण्याची संधी मिळते. या परीक्षकांनी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाला पसंतीही मिळाली आहे. त्यांनी स्वतःची एक वेगळी छाप सोडली आहे. मिनी आणि मी खूप आधीपासून एकत्र आहोत आणि तिच्याबरोबर पुन्हा एकदा काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. या सगळ्या परीक्षकांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचे सल्ले हे सगळंच खूप काही शिकवतं. शो चे सर्वच परीक्षक डान्सच्या बाबतीत खूप अभ्यासू आहेत.

'डान्स इंडिया डान्स'चे प्रोमो सध्या सुरु झाले आहेत. लवकरच त्याचे ऑडिशन्स सुरु होतील. यावेळी शोमध्ये नवीन गोष्टी आणण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement