Advertisement

देवगडच्या वॅक्स म्युझियममध्ये अमृता आणि अंकुश!


SHARES

आतापर्यंत आपण अनेक मोठमोठ्या लोकांचे मेणाचे पुतळे पाहिले असतील. यात बॉलिवूडच्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. देवगडमध्ये आता तुम्हाला कलाकारांचे असे मेणाचे पुतळे पाहता येणार आहेत आणि त्याची सुरुवात अमृता खानविलकर आणि अंकुश चौधरी यांच्या मेणाच्या पुतळ्यांपासून झाली. नुकतंच त्यांच्या या पुतळ्यांचं अनावरण मुंबईमध्ये आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झालं.



मूळचे केरळचे असलेले सुनील कंदलुर यांनी हे संग्रहालय उघडले आहे. २००० साली त्यांनी लोणावळ्यात पहिले संग्रहालय उघडले. त्यात अनेक नामवंत कलाकारांचे आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. नंतर त्यांनी कोचीमध्ये दुसरी शाखा उघडली. या सगळ्या गोष्टी आमदार नितेश राणे यांनी हेरल्या आणि म्हणूनच त्यांनी वॅक्स म्युझियम देवगडला घेऊन यायचे ठरविले.


 

या म्युझियममध्ये अनेक नामवंत कलाकार आणि दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे मेणाचे पुतळे आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, जागतिक पातळीचा महान फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी आणि सुपरस्टार रजनीकांत यांचे पुतळे म्युझियमचे आकर्षण आहेत. तर मराठी कलाकारांमध्ये अमृता खानविलकर आणि अंकुश यांचे पुतळे तयार करण्यात आले आहेत.



पुढील दोन महिन्यात या वॅक्स म्युझियममध्ये प्रेक्षकांना बॉलिवूड सेलिब्रिटी अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान तसेच मराठी कलाकार स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांचे वॅक्स स्टॅच्यू पाहायला मिळतील, असे सुनील यांनी सांगितले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा