Advertisement

अल्लू अर्जुनचा स्वॅग, नाकारली तंबाखू कंपनीची करोडोंची ऑफर

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुननं तंबाखू कंपनीच्या जाहिरातीची ऑफर धुडकावून लावली आहे.

अल्लू अर्जुनचा स्वॅग, नाकारली तंबाखू कंपनीची करोडोंची ऑफर
SHARES

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुननं तंबाखू कंपनीच्या जाहिरातीची ऑफर धुडकावून लावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लूला कंपनीनं करोडोंची ऑफर दिली होती. मात्र अल्लूला त्याच्या चाहत्यांमध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा प्रचार करायचा नाही. त्यामुळे त्याने ही ऑफर नाकारली आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, एका तंबाखू कंपनीनं त्यांच्या ब्रँड एंडोर्समेंटसाठी अल्लू अर्जुनला मोठी रक्कम ऑफर केली होती. मात्र, अल्लूनं ही ऑफर नाकारली. अल्लू स्वतः तंबाखूचं सेवन करत नाही. अल्लूच्या मते, जे मी स्वतः खात नाही, त्याचा प्रचार का करावा.

अजय देवगण आणि शाहरुख खाननंतर अक्षय कुमार विमलच्या जाहिरातीत सामील झाला आहे. त्यामुळे अक्षयला सध्या सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. कारण अक्षयनं त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की, गुटखा कंपन्या मला कोट्यवधी रुपयांची ऑफर देतात, पण मी त्या जाहिराती करत नाही.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन रणवीर सिंगसोबत कमला पसंद पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसले होते. शाहरुख खान, अजय देवगण यांच्या प्रमाणे पान मसाल्याची जाहिरात केल्यानं बिग बींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण आपल्या ७९ वा वाढदिवशी अमिताभ यांनी एक मोठा निर्णय घेत 'कमला पसंद'सोबतचा करार संपुष्टात आणला होता.हेही वाचा

महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर बायोपिक, चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलिज

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा