Advertisement

#MeToo: माझ्यावर कारवाई करू नका, आलोकनाथ यांचं 'सिन्टा'ला साकडं

सिन्टा'ने नियमानुसार सदस्यत्व रद्द करत इतर निर्बंध लादण्याचा इशारा दिल्यावर आलोकनाथ यांनी लेखी पत्र पाठवून आपलं म्हणणं मांडलं आहे.

#MeToo: माझ्यावर कारवाई करू नका, आलोकनाथ यांचं 'सिन्टा'ला साकडं
SHARES

लेखिका विन्ता नंदा यांच्याविरोधातील खटल्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत माझ्यावर कुठलीही कारवाई करू नका, अशी मागणी ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी अँड टीव्ही आर्टिस्ट' असोसिएशन (सिन्टा) कडे केली आहे.


रितसर तक्रार

लेखिका विन्ता नंदा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आलोकनाथ यांच्यावर २० वर्षांपूर्वी लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर अनेक अभिनेत्रींनीही पुढे येत आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले. हे प्रकरण चिघळताच 'सिन्टा'ने वि नंदा यांना आलोकनाथविरूद्ध रितसर तक्रार करण्याचा सल्ला दिला होता.


नोटिशीला उत्तर

नंदा यांनी मागील आठवड्यात 'सिन्टा'कडे तक्रार दाखल केल्यावर 'सिन्टा'ने आलोकनाथ यांना नोटीस बजावत याप्रकरणी खुलासा मागितला होता. सुरूवातीला आलोकनाथ यांनी या नोटिशीकडे दुर्लक्ष केलं असलं, तरी 'सिन्टा'ने नियमानुसार सदस्यत्व रद्द करत इतर निर्बंध लादण्याचा इशारा दिल्यावर आलोकनाथ यांनी लेखी पत्र पाठवून आपलं म्हणणं मांडलं आहे.

या पत्रात त्यांनी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत माझ्यावर कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती 'सिन्टा'ला केली आहे.



हेही वाचा-

#MeToo: माझ्यावरील अारोप खोटे, नाना पाटेकरांचं सिन्टाला उत्तर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा