Advertisement

झी नाट्य गौरव पुरस्कारांवर 'अमर फोटो स्टुडिओ'ची मोहोर


झी नाट्य गौरव पुरस्कारांवर 'अमर फोटो स्टुडिओ'ची मोहोर
SHARES

मुंबई - मराठी सिनेमाला जसे चांगले चांगले दिवस आले आहेत तसेच मराठी नाटकांना ही चांगले दिवस येऊ लागले आहेत. रंगभूमीवर नाटक जगणाऱ्या रंगकर्मींच्या कामाचं कौतुक आणि दखल घेणारा पुरस्कार अर्थात झी नाट्य गौरव पुरस्कार नुकताच मुंबईतील विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात पार पडला.

एकापेक्षा एक व्यवसायिक आणि प्रायोगिक नाटकं सध्या रंगभूमीवर सादर होत आहेत. कोणत्या नाटकांनी यात पुरस्कार जिंकून बाजी मारली यावरच सगळ्यांचे लक्ष लागले होते. यात बाजी मारली आहे ती 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकाने. यात सर्वोत्कृष्ट विनोदी नाटकासह ‘अमर फोटो स्टुडिओ’ नाटकाने आठ पुरस्कार मिळवले. तर यंदाच्या सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाने मिळवला. यंदाचा विशेष लक्षवेधी नाटकाचा पुरस्कार ‘कोडमंत्र’ नाटकाने मिळवला. प्रायोगिक नाटकांमध्ये यावर्षी सर्वोत्कृष्ट नाटकासहित आठ पुरस्कार मिळवत ‘हे राम’ या नाटकाने बाजी मारली.

सर्वोत्कृष्ट अभिनेता संजय नार्वेकर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री शर्वरी लोहकरे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विजय केंकरे असे महत्त्वाचे पुरस्कार पटकावत ‘तीन पायांची शर्यत’ नाटकाने या सोहळ्यावर आपली छाप सोडली. प्रायोगिक नाटकांत सर्वोत्कृष्ट अभिनेता निशांत कदम, अभिनेत्री तेजस्वी परब, दिग्दर्शक राम दौंड आणि सर्वोत्कृष्ट नाटक या महत्त्वाच्या पुरस्कारांसहित इतर चार पुरस्कारांवर आपले नाव कोरत ‘हे राम’ नाटकाने एकहाती बाजी मारली. येत्या ७ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता हा सोहळा झी मराठीवर प्रसारित होईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा