Advertisement

अमेय वाघ दिसणार एकता कपूरच्या ‘बॉयगिरी-मेन विल बी बॉइज’ वेब सिरीजमध्ये


अमेय वाघ दिसणार एकता कपूरच्या ‘बॉयगिरी-मेन विल बी बॉइज’ वेब सिरीजमध्ये
SHARES

मुंबई - टीव्हीवर चालणाऱ्या सासू-सूनेच्या सिरीयल आणि तेच ते रिएलिटी शोज पाहून जर तुम्ही कंटाळलेले असाल, तर आता तुमच्यासाठी एकता कपूर आणतेय, भन्नाट वेबसिरीज. एकताचं ‘ऑल्ट बालाजी’ प्रोडक्शन बॉयगिरी ही मालिका, मैत्री, मस्ती आणि मुला-मुलांची एकमेकांशी व्यक्त होण्याची गंमतीशीर भाषा ह्यावर आहे. नावाप्रमाणेच ‘बॉयगिरी’ मालिका आपल्याला ब्रोमॅन्सच्या विश्वात घेऊन जाते. एकत्र राहताना त्यांच्यातला घट्ट होत जाणारा ऋणानुबंध, त्याचवेळी ‘मेन नेव्हर ग्रो अप’ ह्या तत्वावर दिसणारं त्यांचं मजेशीर वागणं, पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही मालिका पाहताना प्रत्येक पुरूषाला त्याच्या स्वत:च्या तरूणपणीच्या मित्रांची आठवण नक्कीच होईल. ह्या बॉयगिरीमध्ये प्रनवेश, अव्दैत, मनजोत, जतीन, रवी आणि बंदा अशी काही मनोरंजक पात्र दिसणार आहेत. ह्या सगळ्या मित्रांची मालिका दर एपिसोडगणिक मजेदार होत जाताना दिसेल. काही गंमतीशीर घटानाक्रमामध्ये अडकल्यावर व्यक्ति तितक्या प्रकृती ह्या न्यायाने ह्या मालिकेतली पात्र वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतात. तेव्हा पाहणाऱ्याची हसून-हसून अक्षरश: मुरुकुंडी वळते.
अभिनेता अमेय वाघची ह्या मालिकेतली भूमिका एका खोडकर मुलाची आहे. ह्याविषय़ी तो अधिक सांगतो,“बॉयगिरी मालिकेतली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अगदी खऱ्या आयुष्यातले काही जवळचे मित्र ह्य़ा मालिकेसाठी एकत्र आलेत. दर प्रोजेक्टमध्ये काही वेगळं करणं, ही तर बालाजीची खासियत. आणि ऑल्ट बालाजीच्या सर्व मालिका हिट गोष्ट पून्हा एकदा अधोरेखीत करतील. बॉयगिरी मालिका ब्रोमॅन्सला अजून नव्या पातळीवर घेऊन जाईल. मी बज्जुच्या भूमिकेत तुम्हांला दिसेन. हा बज्जू आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेल्या सगळ्या जुगाडूंपेक्षा मोठा जुगाडू आहे. तुम्हांला गरज नसली तरीही तो दरवेळा मदतीला तत्पर असतो.” बॉयगिरी मालिका लवकरच ऑल्ट बालाजी अॅपवर सुरू होत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा