Advertisement

आमिरने केली झायराची पाठराखण...


आमिरने केली झायराची पाठराखण...
SHARES

मुंबई - दंगल चित्रपटात आपल्या मुलींच्या पाठीमागे ठाम राहणाऱ्या अभिनेता आमिर खानने रीयल लाईफमध्येही तोच आदर्श घालून दिला आहे. फेसबुकवरील एका पोस्टमुळे वादग्रस्त ठरलेल्या दंगल चित्रपटामधील झायरा वसीम या मुलीला आमिरने आपला पाठिंबा दिला आहे.
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची झायराने नुकतीच भेट घेतली होती. या वेळी मुफ्ती यांनी झायराचा उल्लेख काश्मिरी रोल मॉडेल असा केला. या उल्लेखावरून मग सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या होत्या. त्याबद्दल खुद्द झायरानेही आपली काही मते व्यक्त केली. याबद्दल आमिर म्हणतो, झायराने केलेले निवेदन माझ्या वाचनात आले. त्यावरून मी अंदाज बांधू शकतो की तिने अशा प्रकारचे विधान का केले असावे. झायरा, खरे तर तुला हे माहिती असायला हवे की आम्ही सर्वच जण तुझ्याबरोबर आहोत. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्यासारखी हुशार, तरुण, चमकदार, मेहनती, प्रेमळ आणि धाडसी मुले ही देशभरातील मुलांसाठी रोलमॉडेल आहेत. परमेश्वराचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठिशी राहील.
आपल्या निवेदनाच्या शेवटी आमिरने सर्वसामान्य जनतेलाच एक आवाहन केले आहे. झायरला एकटे राहू द्या. तिचे वय फक्त 16 आहे, ही गोष्टदेखील विसरू नका, असेही आमिरने म्हटले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement