चित्रातून हास्य- सौंदर्य रेखाटलं

 Lower Parel
चित्रातून हास्य- सौंदर्य रेखाटलं
चित्रातून हास्य- सौंदर्य रेखाटलं
चित्रातून हास्य- सौंदर्य रेखाटलं
चित्रातून हास्य- सौंदर्य रेखाटलं
चित्रातून हास्य- सौंदर्य रेखाटलं
See all

वरळी - चित्रकार निता मकवाना यांनी वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये हास्य आणि सौंदर्य या संकल्पनेवर आधारीत चित्र प्रदर्शन लावले आहे. या प्रदर्शनात 26 चित्रांचा समावेश आहे. या चित्रांच्या किंमती 15 हजार ते 60 हजार रुपयांदरम्यान आहेत. निता या मुळ मुंबईतल्या चित्रकार असल्या तरीही त्यांची भारतात अनेक ठिकाणी चित्र प्रदर्शने लावण्यात आली आहेत. हे प्रदर्शन 25 ते 31 ऑक्टोबरपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले आहे. या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या चित्रांमध्ये विविध वयोगटातील व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हास्य रेखाटण्यात आले आहे. त्याच बरोबर मनाला आनंद वाटेल अशा फुले झाडे यांची चित्रे देखील या ठिकाणी लावण्यात आली आहेत. प्रदर्शनात लावण्यात आलेले बुद्धांचे चित्र लोकांचे लक्ष वेधून घेणारे आहे.

Loading Comments