Advertisement

छोट्या दोस्तांचे स्नेहसंमेलन


छोट्या दोस्तांचे स्नेहसंमेलन
SHARES

घाटकोपर - पंतनगर इथल्या विनिता विकास मंडळाच्या शिशु विकास प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. 25 जानेवारीला सकाळी 10 वाजता मुलांच्या स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली. नर्सरी ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.
कार्यक्रमात शाळेतील मुलांनी नृत्य सादर केलं. नाटकांच्या माध्यमातून प्राणी, पक्षी आणि झाडे यांचं महत्व या कार्यक्रमातून सांगण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. तसंच लहान मुलांनी सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणाचे संदेश सुद्धा या कार्यक्रमातून दिला. या कार्यक्रमात विनिता विकास मंडळाच्या अध्यक्षा निता दातार देखील उपस्थित होत्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा