Advertisement

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवीन गॅरीची एन्ट्री


'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवीन गॅरीची एन्ट्री
SHARES

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. टीआरपीमध्ये अव्वल असलेली ही मालिका राधिका, गुरूनाथ, शनाया या तिन्ही व्यक्तीरेखांमुळे सर्वांच्या पसंतीस उतरली अाहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेच्या सेटवर गॅरीसारखाच कपडे घातलेला गुरुनाथ अवतरला अाणि सर्वच जण गोंधळात पडले. या नव्या गॅरीला पाहून चक्क राधिका अाणि शनायाही बुचकळ्यात पडल्या.



कोण आहे हा नवा गॅरी?

गुरुनाथसारखाच दिसणारा हा गॅरी दुसरा-तिसरा कुणी नसून कन्नड भाषेतील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील गुरुनाथ सुभेदार. मराठीत ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरल्यानंतर झी वाहिनीनं तीच मालिका कन्नड भाषेत सुरू करण्याचा निर्णय घेतला. कन्नड भाषेत ही मालिका सुब्बलक्ष्मी समसारा या नावानं सुरू अाहे. या मालिकेत भवानी सिंग हा गुरुनाथ सुभेदारची व्यक्तिरेखा साकारत अाहे. भवानी सिंगनं नुकतीच माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या सेटवर भेट दिली. या नव्या गॅरीसोबत राधिका, शनाया अाणि गुरुनाथनंही मस्त फोटोसेशन केलं.


">


हेही वाचा - 

ना 'खान'दान, ना 'कपूर अॅण्ड सन्स', भोजपुरी सिनेमाच मुंबईतील सिंगलस्क्रीनचा तारणहार!

अमेय वाघ 'महाराष्ट्राचा फेव्हरेट'! 'फास्टर फेणे' ठरला अव्वल!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा