Advertisement

'तुमच्या समर्थकांशी कसं वागायचं’, अनुराग कश्यपनं विचारला मोदींना प्रश्न

मोदींच्या यशाबद्दल दिग्दर्शक अनुराग कश्यपनंही त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, एका मोदी समर्थकाच्या वागण्यावरून त्यानं पंतप्रधान मोदींना टोलाही लगावला.

'तुमच्या समर्थकांशी कसं वागायचं’, अनुराग कश्यपनं विचारला मोदींना प्रश्न
SHARES

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला मिळालेल्या दणदणीत यशानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्या. मोदींच्या यशाबद्दल दिग्दर्शक अनुराग कश्यपनंही त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, एका मोदी समर्थकाच्या वागण्यावरून त्यानं पंतप्रधान मोदींना टोलाही लगावला. 'माझ्या १८ वर्षाच्या मुलीला अश्लील भाषेत बलात्काराची धमकी देणाऱ्या तुमच्या समर्थकांना कसं तोंड द्यायचं सांगा', असा सवाल दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप यांनं पंतप्रधान मोदींना केला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयानंतर एका मोदी समर्थकानं अनुराग कश्यपच्या मुलीला ट्विटरवरून अश्लील भाषेत बलात्काराची धमकी दिली आहे. त्या समर्थकाच्या ट्विटरचा स्क्रीनशॉट शेअर करत अनुरागनं मोदींना असा प्रश्न विचारला आहे.  


ट्विटरवरून बलात्काराची धमकी

चौकीदार रामसंघी नावाचा हा मोदी समर्थक असून त्यानं ट्विटर अकाउंटवरून अनुरागची मुलगी आलिया कश्यप हिला बलात्काराची धमकी दिली आहे. 'जय श्रीराम... तुझ्या बापाला त्याचं तोंड बंद ठेवायला सांग. त्यानं असं केलं नाही तर तुझ्यावर बलात्कार करेन' अशा अश्लील शब्दांत धमकी देणारं ट्विट त्यानं केलं आहे.समर्थकांशी कसं वागावं

या मोदी समर्थकाचं ट्विटही शेअर करत अनुरागनं 'प्रिय, नरेंद्र मोदी सर, तुम्ही मिळवलेल्या विजयासाठी तुमचं अभिनंदन...माझ्या आणि तुमच्यामध्ये असलेल्या वैचारिक मतभेदांमुळे तुमचे समर्थक माझ्या मुलीला बलात्काराच्या धमक्या देत आहेत आणि तुमच्या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. तुमच्या या अशा समर्थकांशी आम्ही कशाप्रकारे वागावे हे तुम्ही आम्हाला सांगा ही विनंती' असं ट्विट केलं आहे.हेही वाचा -

कल्याण, भिवंडी, ठाणे आणि पालघरमध्ये महायुतीचाच विजय

'राज ठाकरेंनी भरावा मनोरंजन टॅक्स' - विनोद तावडेRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा