अर्जुन कपूरची 'हाफ गर्लफ्रेंड'

Mumbai
अर्जुन कपूरची 'हाफ गर्लफ्रेंड'
अर्जुन कपूरची 'हाफ गर्लफ्रेंड'
अर्जुन कपूरची 'हाफ गर्लफ्रेंड'
See all
मुंबई  -  

अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा 'हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. लेखक चेतन भरत यांच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारीत आहे. बालाजी मोशन पिक्चर्स अंतर्गत हा सिनेमा चित्रित झालाय.

१९ मेला हा चित्रपट पदर्शित होणार आहे. 'हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर, लेखक चेतन भगत आणि दिग्दर्शक मोहित सुरी उपस्थित होते.

माझी सुद्धा एक हाफ गर्लफ्रेंड होती - अर्जुन कपूर

पत्रकारांनी अर्जुनला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की, माझ्या आयुष्यातही एक हाफ गर्लफ्रेंड होती. एका नव्या नात्यात गुंतण्याआधी त्या नात्याला परखले जाते, वेळ दिला जातो. हे सर्व मी केले आहे. मी सुद्धा माझ्या एका मैत्रिणीला प्रपोज करायचा विचार केला. प्रपोज करायचा म्हणून मी मस्त तयार होऊन गेलो. पण पाहतो तर काय? ती एका दुसऱ्या मुलासोबत होती. मला वाटले की तो तिचा भाऊ आहे. पण तिने ओळख करून दिली की तो तिचा बॉयफ्रेंड आहे आणि त्याने मला आजच प्रपोज केले. त्यादिवशी मला पश्चाताप झाला. मी जरा आधी प्रपोज केलं असतं तर ती माझी हाफ गर्लफ्रेंड नाही तर फुल्ल गर्लफ्रेंड झाली असती. आज त्या मुलीचे लग्न झाले आहे आणि ती इंग्लंडमध्ये राहते.

श्रद्धाचा हाफ बॉयफ्रेंड अर्जुन
श्रद्धा कपूरने मस्करीत का होईना अर्जुन कपूरला स्वत:चा बॉयफ्रेंड मानले. मीडियाने प्रश्न विचारला तेव्हा श्रद्धाने सांगितले की, माझाही एक बॉयफ्रेंड आहे. तो दुसरा तिसरा कोणी नाही अर्जुन कपूर आहे. अर्जुन कपूर या चित्रपटात माधव झा तर श्रद्धा कपूर यात रियाची भूमिका साकारत आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.