Advertisement

'आर्ट फॉर आर्टिस्ट'मध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन


'आर्ट फॉर आर्टिस्ट'मध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन
SHARES

फोर्ट - येथील शिवाजी महाराज म्युझियममध्ये 'आर्ट फॉर आर्टिस्ट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम 27 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमामध्ये देशाभरातील विविध असे अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. यात बंगळुरु, उडिसा, केरळ, दिल्ली, पंजाब अशा विविध भागांमधील 40 स्पर्धकांचा समावेश आहे. या कार्यक्रमात लावणी, भरतनाट्यम, कुच्चीपुड्डी अशा भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. मानवी वृत्तीच्या विविध छटा या निमित्ताने पाहायला मिळाल्या. शिवाय धार्मिकतेवर आधारीत चित्रांचे प्रदर्शनही येथे भरवण्यात आले होते. 1 हजार तेे 45 हजार रूपयांपर्यंतची चित्रे प्रदर्शनात विक्रीस उपलब्ध होते. चित्रे विकल्यानंतर सर्व रक्कम त्या त्या चित्रकारांच्या नावाने बँक खात्यात भरण्याची सोय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली होती.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा