अरुणाभ कुमारला अटकपूर्व जामीन मंजूर

  Goregaon East
  अरुणाभ कुमारला अटकपूर्व जामीन मंजूर
  मुंबई  -  

  माजी सहकारी महिलेशी छे़डछाड केल्याच्या प्रकरणात 'द व्हायरल फीवर या ऑनलाइन एनटरटेन्मेंट' चॅनलचा सीईओ अरुणाभ कुमार याला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या दिंडोशी न्यायालयाने या प्रकरणी त्याचा अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. या प्रकरणाच्या तपासात अरुणाभ यांनी पोलिसांना वेळोवेळी मदत करावी आणि गरज पडल्यास पोलीस ठाण्यात यावे, असा आदेश दिंडोशी सत्र न्यायालयाने दिला आहे.

  टीव्हीएफच्या माजी महिला कर्मचाऱ्याने छेडछाड केल्याप्रकरणी 29 मार्चला अरुणाभविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354 अ आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

  त्यानंतर 30 मार्चला त्याच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचा आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अनेक मुलींनी अरुणाभविरोधात लैंगिक छळाचा आरोप केल्याचं समोर आलं आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.