'सा रे ग म पाच्या उस्तादांना भेटायला आशा भोसले

 Churchgate
'सा रे ग म पाच्या उस्तादांना भेटायला आशा भोसले

मुंबई - झी टीव्हीवरील सिगिंग रिअॅलिटी शो सा रे ग म प लिटील चॅम्प’ सीजन-6 मध्ये गायिका आशा भोसले यांनी हजेरी लावली. आशा भोसले यांच्या हजेरीमुळे गाणाऱ्या छोट्या उस्तादांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले. गाणाऱ्या मुलांना पाहून आशाताईंनी आपला आनंद व्यक्त केला. तसंच त्यांनी गायलेल्या गाण्यांमुळे मुलांना ही मार्गदर्शन मिळालं.

75 वर्ष आपल्या गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या 83 वर्षीय आशा भोसले यांचा हा प्रवास खूपच रहस्यमय आणि मनाला भावून टाकणारा आहे. दर आठवड्यात शनिवारी 9 वाजता सा रे ग म प लिटील चॅम्प’ सीजन-6 हा कार्यक्रम झी टीव्ही वर लागतो. या कार्यक्रमातून अनेक प्रतिभावंत मुलांनी आपली ओळख निर्माण केलीय. तर, आशा भोसले यांच्यासोबतचा हा स्पेशल एपिसोड या 31 मार्चला दाखवला जाणार आहे.

Loading Comments